ग्लासभर पाण्यात दोन थेंब लिंबू! दर महागले २० ते २५ रुपयांना सरबत

By निखिल म्हात्रे | Published: April 12, 2024 11:29 PM2024-04-12T23:29:25+5:302024-04-12T23:29:37+5:30

सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. यामुळे घराबाहेर पडलेल्यांना थंडावा मिळण्यासाठी या काळात लिंबू सरबतला मागणी वाढत असते.

Two drops of lemon in a glass of water! The price is expensive, the syrup is 20 to 25 rupees | ग्लासभर पाण्यात दोन थेंब लिंबू! दर महागले २० ते २५ रुपयांना सरबत

ग्लासभर पाण्यात दोन थेंब लिंबू! दर महागले २० ते २५ रुपयांना सरबत

अलिबाग : लिंबाचे दर वाढल्याने लिबू सरबतही महागले आहे. २० ते २५ रुपयांना सरबत विकले जात असून, त्यातही नावापुरते लिंबू पळले जात आहे. उन्हाच्या झळा शमविण्यासाठी नाईलाजाने ते नागरिक पीत आहेत.
घाऊक बाजारात लिंबाचे दर दुपटीने वाढले आहेत, तर किरकोळ बाजारात एक लिंबू सात रुपयांना विकले जात आहे. पुढील कालावधीत दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. ऐन उन्हाळ्यात लिंबाचे दर महागल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. यामुळे घराबाहेर पडलेल्यांना थंडावा मिळण्यासाठी या काळात लिंबू सरबतला मागणी वाढत असते. मात्र, लिंबाचे दर वाढल्याने सरबतही महागले आहे. पाच ते दहा रुपयांना मिळणारे सरबत आता २० ते २५ रुपयांना विकल्या जात आहे. विशेष म्हणजे, ग्लासभर पाण्यात चवीपुरते लिंबू पिळले जात आहे.

दही, ताकाला पसंती

थंडपेय पेय घातक असल्याने लोक या काळात लिंबाचे सरबत पितात. मात्र, लिंबचे दर वाढल्याने सरबतही महागले आहे. तो आता ग्राहकांना परवडत नाही. त्यामुळे दही किंवा ताकाला पसंती दिली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून लिंबाच्या दरात वाढ होत आहे. सद्य:स्थितीत आवक घटली आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे. यापुढील काळात लिंबाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
- महेंद्र पाटील, भाजी विक्रेता.

लिंबू महागल्याने सध्या जेवणात कमी वापर करतो. परंतु लिंबाच्या तुलनेत आंबट म्हणून दह्याचा वापर करतो. त्यामुळे दही खाणे फायदेशीर वाटते.
- राजश्री भगत, गृहिणी.

Web Title: Two drops of lemon in a glass of water! The price is expensive, the syrup is 20 to 25 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.