ट्रान्सफॉर्मरचा खांब धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:11 AM2019-07-15T00:11:27+5:302019-07-15T00:11:35+5:30

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील शंकर मंदिराजवळील ट्रान्सफॉर्मरचा वीजखांब खालील बाजूने सडला आहे.

Transformer pole is dangerous | ट्रान्सफॉर्मरचा खांब धोकादायक

ट्रान्सफॉर्मरचा खांब धोकादायक

Next

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील शंकर मंदिराजवळील ट्रान्सफॉर्मरचा वीजखांब खालील बाजूने सडला आहे. जीर्ण वीजखांब भरवस्तीत असल्यामुळे कोणत्याही क्षणी तो कोसळून जीवितहानी होऊ शकते. या गंभीर समस्येकडे महावितरणने लक्ष देत ट्रान्सफॉर्मरचे येथून स्थलांतर करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
बोर्लीपंचतन येथील शंकर मंदिर परिसरात दाट नागरी वस्ती असून, पलीकडे स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी असल्याने शेतीकामासाठी ट्रान्सफॉर्मर असलेल्या रस्त्याने जावे लागते. दरम्यान, वेळोवेळी ट्रान्सफॉर्मरवर होणाºया शॉर्टसर्कि टमुळे ये-जा करणाºयाला व आजूबाजूच्या घरांना ट्रान्सफॉर्मर धोकादायक ठरत आहे. भरवस्तीत घराला खेटूून असणारा गंजलेले खांब केव्हाही तुटून पडेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे दुर्दैवाने खांब तुटल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंदिराजवळील ट्रान्सफॉर्मरशी जोडले गेलेल्या हजारोंच्या अधिक संख्येत ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. सडलेला विद्युत खांब केवळ समोरील जोडणीच्या आधारावर लोंबकळत आहे. एकमेकाला लिंक असलेले हे खांब लगतच्या घरांवर कधीही कोसळू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून हा खांब जीर्ण अवस्थेत असल्याने ही बाब स्थानिकांच्या जीवावर बेतणारी ठरत आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर स्टॅड येथून स्थलांतर करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सद्यस्थितीत बोर्लीपंचतन भागात वीज पुरवठा विषयक अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे अनेकदा येथील वीज पुरवठाही खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. तालुक्यात मान्सून पावसाने सुरुवात केली असताना महावितरणने पावसाळी दुर्घटना टाळण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाही, यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बोर्लीपंंचतन शहरातील जीर्ण वीजखांब बदलण्यात येतील. शंकर मंदिराजवळील ट्रान्सफॉर्मरवर मोठ्या प्रमाणात वीजवाहिनी जोडणी असल्याने क्षमतेनुसार अंदाजे खर्च पत्र (इस्टिमेंट) तयार करून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे दिला आहे.
- महेंद्र वाघपैंजन,
उपअभियंता, श्रीवर्धन महावितरण.
>बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीतर्फे शंकर मंदिराजवळील ट्रान्सफॉर्मरचा विद्युत खांब लवकरच बदलण्यात यावा, असे मागणी पत्र श्रीवर्धन महावितरण विभागाला दिले असून दुरुस्तीसाठी विलंब होत असल्यास आंदोलन छेडण्यात येईल.
- नंदकिशोर भाटकर,
ग्रुपग्रामपंचायत सदस्य, बोर्लीपंचतन.

Web Title: Transformer pole is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.