शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:05 AM2019-06-12T00:05:46+5:302019-06-12T00:08:54+5:30

जिल्ह्यात सर्वशिक्षा मोहिमेंतर्गत पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडारातून पुस्तक कार्यकक्षेतील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्हा परिषदेंतर्गतच्या व नाशिक, धुळे, मालेगाव व जळगाव या महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ४२ कोटी ६१ लाख २३ हजार १४३ रुपयांच्या एकूण ९९ लाख ४२ हजार ७६२ पुस्तक प्रतींचे तालुकास्तरापर्यंत वितरण करण्यात आले आहेत.

Textbooks will be available to students on the first day of school | शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

googlenewsNext
ठळक मुद्देबालभारतीकडून शंभर टक्के वितरण अकरावीचा अभ्यासक्रम बदलल्याने पुस्तकांची प्रतीक्षा

नाशिक : जिल्ह्यात सर्वशिक्षा मोहिमेंतर्गत पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडारातून पुस्तक कार्यकक्षेतील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्हा परिषदेंतर्गतच्या व नाशिक, धुळे, मालेगाव व जळगाव या महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ४२ कोटी ६१ लाख २३ हजार १४३ रुपयांच्या एकूण ९९ लाख ४२ हजार ७६२ पुस्तक प्रतींचे तालुकास्तरापर्यंत वितरण करण्यात आले आहेत.
प्राथमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून, तर माध्यमिकचे १७ जूनपासून सुरू होणार असून, यंदाही पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात सर्व विषयांची मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा बालभारतीचा मानस असून, त्यादृष्टीने नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या पंचायत समितीचे शिक्षण विभाग व नाशिक, धुळे, मालेगाव व जळगाव या महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकूण ९९ लाख ४२ हजार ७६२ पाठ्यपुस्तकांच्या प्रतींचे वाटप करण्यात आले आहे. नवे शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० जूनपासून सुरू होणार असून, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात सर्व विषयांची मोफत पाठ्यपुस्तके मिळावी यासाठी बालभारतीच्या विभागीय कार्यालयाकडून पाठ्यपुस्तकांचा शंभर टक्के पुरवठा करण्यात आला आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली
जातात.
ही पुस्तके विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मिळण्याच्या दृष्टीने शिक्षण विभाग, पाठ्यपुस्तक मंडळ आणि सरकारी वाहतूक ठेकेदार यांच्याकडून नियोजन आखून ३१ मेपर्यंत विभागीय पाठ्यपुस्तक भांडारातून तालुकास्तरापर्यंतचा पुस्तकांचा पुरवठा पूर्ण करण्यात आला असून, संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांकडून पंचायत समिती शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये पुस्तके घेऊन जात आहेत.
महापालिका क्षेत्रात ६० केंद्रांना वितरण
सर्वशिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या ९० शाळांसह सर्व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे २४ केंद्रांमधून वितरण केले जाते. ही सर्व पुस्तके महापालिकेच्या जेतवननगर व मुंबईनाका भागातील गुदामांमध्ये पोहोचली असून, शहरातील केंद्रावर ६० टक्के पुस्तक ांचा पुरवठा झाला असून, उर्वरित पुस्तकांचा पुरवठा बुधवारी पूर्ण होणार आहे. त्यानंतर केंद्र स्तरावर शाळांना पुस्तकांचे वाटप सुरू होणार असून, मोठ्या पटसंख्येच्या शाळांना थेट गुदामांमधूनच पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर्षी दुसरीचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे पुस्तके वितरणातकाही प्रमाणात उशीर झाला असला तरी सर्व शाळांना शाळा सुरू होण्यापूर्वीच पुस्तकांचा पुरवठा करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.
जिल्हा परिषद क्षेत्रातील पुरवठा
जिल्हा प्रतींनुसार पुरवठा नाशिक : २९ लाख ३८ हजार ९६५, धुळे : १२ लाख ९६ हजार १०७, जळगाव : २६ लाख ५५ हजार ६३०, नंदुरबार : १३ लाख ४६७. एकूण प्रती : ८१ लाख ९१ हजार १६९. महानगरपालिका क्षेत्रातील पुरवठा. मनपा प्रतींनुसार पुरवठा नाशिक : ६ लाख ४८ हजार ३०२, धुळे : ३ लाख ६ हजार ३५३, जळगाव : २ लाख ६० हजार ३३, मालेगाव : ५ लाख ३६ हजार ९०५. एकूण प्रती : १७ लाख ५१ हजार ५९३.
अक रावीच्या पुस्तकांची प्रतीक्षा
शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून दुसरी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. सर्वशिक्षा अभियानात पहिली ते आठवीचा समावेश असून, यातील दुसरीच्या पुस्तकांसह सर्व पुस्तके शाळांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहे; मात्र अकरावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके अजूनही बालभारतीच्या नाशिक कार्यालयास उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे या पुस्तकांच्या वितरणालाही काही प्रमाणात वेळ लागण्याची शक्यता आहे. अकरावीची सध्या प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याने अकरावीचे वर्ग सुरू होण्यापूर्वीच अकरावीचीही पुस्तके उपलब्ध होऊ शकणार आहे.

Web Title: Textbooks will be available to students on the first day of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.