रायगडमध्ये अपघातांची मालिका सुरूच, एक ठार तर १८ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 05:00 AM2018-11-13T05:00:47+5:302018-11-13T05:01:08+5:30

विविध ठिकाणी सहा अपघात : एक ठार तर १८ जखमी; मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा फटका

A series of accidents started in Raigad, one killed and 18 injured | रायगडमध्ये अपघातांची मालिका सुरूच, एक ठार तर १८ जखमी

रायगडमध्ये अपघातांची मालिका सुरूच, एक ठार तर १८ जखमी

Next

जयंत धुळप

अलिबाग : गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि अंतर्गत रस्त्यावर वाहन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सहा विविध वाहन अपघातात १ जण ठार तर १८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री १.४० वाजण्याच्या सुमारास माणगावकडे जाणाऱ्या पिकअप जीपचालकाने (एम.एच.०६ /जी ९४८७) अचानक बे्रक लावल्याने मागून येणाºया दुचाकीची (एम.एच.०६/बीटी ८९९९) जीपला जोरदार धडक बसली.

या अपघातात दुचाकीवरील नितेश परशुराम मालोदे आणि सनी संजय जांबरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोरेगाव पोलिसांनी या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
माणगाव-पुणे रस्त्यावर सणसवाडी येथे रविवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास कार (एम.एच.१२ एन.ई.६१३८) हलगर्जीपणे चालवल्याने कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यालगत पलटी झाली. या अपघातात कारचालक अमित वाघ याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तानाजी नामदेव निकटे, योगेश एकनाथ निकटे, राजू रमण पाटील, सूरज नंदकुमार कदम, अक्षय शेळके, यज्ञेश पोवले, नागेश मोहकर (सर्व रा. पिरंगुट, ता.मुळशी, पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी माणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास भरडखोलकडून श्रीवर्धनकडे जाणाºया दुचाकीस (एम .एच.०६ बी.के ३७३०) समोरून आलेल्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील प्रथमेश गजानन खोपटकर (१८) आणि अविकार गोविंद खोपटकर (१५) दोघेही रा.भरडखोल-श्रीवर्धन हे जखमी झाले. त्यांना श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर फरार चालकाचा श्रीवर्धन पोलीस शोध घेत आहेत. दिवाळीच्या सुटीनिमित्त महामार्गावर वाहनांची संख्या वाढली असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

महामार्गावर एसटी-दुचाकी अपघातात एक ठार

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावाजवळ सोमवारी दुपारी दोन वाजण्याचा सुमारास एसटी आणि दोन दुचाकीस्वारात अपघात झाला. या अपघातात एक मुलगी जागीच ठार झाली तर दोन दुचाकीवरील चार जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावाजवळ एसटी आणि दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. अपघातात माणगावकडून महाडकडे येणाºया एसटी बसची शेजारून जात असलेल्या दुचाकीला धडक दिली. याच दरम्यान समोरून आलेला दुचाकीस्वारही येऊन आपटला. जनार्दन डोंगरे हे आपल्या ताब्यातील दुचाकीने (एम. एच.0६ बी.ए. ६४३८) आपल्या दोन भाच्यांना घेऊन महाडकडे जात होते. तर समोरील बाजूने प्रजाल सुधीर गावडे आणि सुभाष नाडकर हे दुचाकीने (एम.एच.0६ बी.क्यू. ३८८२) महाडहून तळेगावकडे जात होते. या अपघातात टोळ गावातून महाडकडे येत असलेल्या दुचाकीवरील वैष्णवी सुधीर मनवे (१७) हिचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार जनार्दन डोंगरे आणि वैभवी मनवे, प्रजाल सुधीर गावडे आणि सुभाष नाडकर असे चार जण गंभीर जखमी झाले. मूळच्या वहूर येथील रहिवासी असलेल्या या दोघी बहिणी दहिसरहून दिवाळीनिमित्त गावी मामाकडे टोळ गावी आल्या होत्या. टोळ येथून मुंबईला जाण्यासाठी दुचाकीवरून महाडमध्ये येत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर एस.टी. चालकाने बस अपघातस्थळी न थांबवता थेट महाड आगार गाठले. अपघातस्थळी एसटीच्या मागून येणाºया वाहन चालकांनी पाठलाग चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

डंपरची कारला धडक
च्गोवा राष्ट्रीय महामार्गावर वडखळजवळच्या कोलेटी गावी शनिवारी संध्याकाळी ठाणे येथून कानसई येथे जाणाºया कारला (एम. एच.०६ बी.एम.६४८३) पेट्रोलपंपाजवळ पेणकडे जाणाºया डंपरने (एम.एच. ०५/ सी. ए. ४९३३) जोरदार धडक दिली.
 

Web Title: A series of accidents started in Raigad, one killed and 18 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.