Selling of fake manure, caution of farmers | बनावट खतांची विक्री, शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा
बनावट खतांची विक्री, शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा

अलिबाग -  राज्यात काही ठिकाणी मूळ सेंद्रिय खताची नक्कल करून खताच्या बॅगवर चुकीचा मजकूर छापून ते खत विक्र ी करीत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. डी.ए.पी. व पोटॅश या मूळ खताच्या गोणीची नक्कल करून आॅर्गनिक डी.ए.पी. किंवा नॅचरल पोटॅश अशा बनावट नावाने विक्री करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे शेतकºयांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची खत विक्री ही खत नियंत्रण आदेश १९८५ या कायद्यान्वये दंडनीय अपराध आहे. या प्रकरणी कृषी विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ज्या ठिकाणी असा प्रकार निदर्शनास येत आहे त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
या बनावट खतविक्रीच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी डी.ए.पी व पालाशयुक्त खते खरेदी करताना दक्षता घ्यावी. बॅगेवरील मजकुराची शहानिशा करावी. दिशाभूल करून विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ जवळच्या पंचायत समिती, कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्र आणि राज्य शासनाने मंजूर केलेल्या खताच्या ग्रेडसारखी दिसणारी, अनुकरण, नक्कल केलेल्या खतांची खरेदी करण्यात येऊ नये. खताच्या बॅगवर त्यामध्ये असणारे रासायनिक घटक, मूलद्रव्याचे प्रमाण नमूद केलेले असणे बंधनकारक आहे. त्याची खातरजमा करण्यात यावी. उदा. डी.ए.पी. रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण १८ टक्के व स्फुरदचे प्रमाण ४६ टक्के असेल, तसा मजकूर बॅगवर छापलेला असल्याची खात्री करावी. खताच्या बॅगवर लिहिलेला मजकूर नीट वाचून, खात्री करून विक्रेत्यांशी चर्चा करून शंका समाधान झाल्यानंतरच खत खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

१ हजार १३१ निरीक्षक नियुक्त
१राज्यात कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित असून या कामासाठी राज्यात ११३१ खते, बियाणे, कीटकनाशके निरीक्षकांची नेमणूक केली आहे.
२सद्यस्थितीत खरीप हंगामास सुरुवात झाली असून पिकासाठी रासायनिक खते खरेदी करताना अधिकृत परवानाधारक विक्र ी केंद्रातून व केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या गुणवत्ता व दर्जाची हमी देणाºया अधिकृत ग्रेडच्या खतखरेदीस प्राधान्य द्यावे.
३कोणत्याही परिस्थितीत विनापरवाना विक्र ी होत असलेल्या ठिकाणाहून, दूरध्वनीवरून संपर्क साधून विक्र ी करणारे विक्रे ते, शेतकºयांना घरपोच खत देणारे अनधिकृत विक्रे ते यांच्याकडून खतखरेदी करू नये. खरेदी केलेल्या खताची रीतसर पावती घेण्यात यावी व ती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी.
४खतात भेसळ असल्याची शंका दूर करण्यासाठी खतांची पाकिटे व गोणी सीलबंद असल्याची खात्री करावी, अशा सूचना कृषी विभागाने शेतकºयांना दिल्या आहेत.


Web Title: Selling of fake manure, caution of farmers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.