बाटलीबंद पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह, शु्द्ध पाण्याच्या नावाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 06:41 AM2018-05-11T06:41:19+5:302018-05-11T06:41:19+5:30

पाण्याच्या टंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांसोबतच मध्यमवर्गीय नागरिकांना देखील सतावत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील समारंभ, लग्न आदी कार्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे जार वापरले जात आहेत.

Question marks on the purity of the bottled water | बाटलीबंद पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह, शु्द्ध पाण्याच्या नावाने फसवणूक

बाटलीबंद पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह, शु्द्ध पाण्याच्या नावाने फसवणूक

Next

- मयूर तांबडे
पनवेल - पाण्याच्या टंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांसोबतच मध्यमवर्गीय नागरिकांना देखील सतावत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील समारंभ, लग्न आदी कार्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे जार वापरले जात आहेत. कॅनविक्रे ते मिनरल वॉटर असल्याच्या नावावर केवळ थंड पाणी ग्राहकांना पुरवीत आहेत. कॅनमधून व बंद बॉटलमधून पाणी विकणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी होऊन फसवणूक करणाºयांवर कारवाईची गरज आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. तर शहरी भागात वेगवेगळ्या प्रकारचे पाणी येत असल्याने आजारी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील नागरिक बाटलीबंद तसेच पाण्याचे जार पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास वापरत आहेत. जारचे पाणी दीड रु पया लिटर तर बाटलीतील पाणी पंधरा ते वीस रु पये लिटर या दराने नागरिकांना विकत घ्यावे लागत आहे. पनवेल परिसरात सुमारे पाच ते दहा लाख रु पये खर्च करून कूपनलिकेद्वारे पाणी घेऊन मशिनच्या साहाय्याने पाणी स्वच्छ करून विकण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. सध्या लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात होत असून, प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या कॅन दिसून येतात. परंतु, हे पाणी खरोखरच शुद्ध आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
युव्ही स्टरीलायझेशन, सूक्ष्म गाळणी व ओझोनायझेशन आदी प्रक्रि या करूनच पाणी कॅनद्वारे नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे. परंतु, मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पनवेल परिसरात पाण्याचे दहा ते पंधरा कारखाने आहेत. त्यावर अन्न व औषधी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच वैधमापन शास्त्र विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. अन्न व औषधी प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या माध्यमाद्वारे कॅनमधील पाण्याची चाचणी व शहानिशा होत नसल्याची तक्र ार करण्यात येत आहे. मात्र, प्रशासन याची दखल घेत नसल्याचा आरोप होत आहे.
पनवेल परिसरात अनेक अनधिकृत बाटलीबंद पाण्याचे वितरक असल्याने अशा वितरकांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील छोट्या-मोठ्या कार्यालयापासून अनेक घरांपर्यंतही या जारच्या पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. बाटलीबंद पाणी विकण्यासाठी ब्युरो आॅफ इंडियन स्टॅण्डर्डची परवानगी असणे आवश्यक आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाची परवानगी असणेही गरजेचे आहे, तरच या परवानग्या असलेला वितरकच बाटलीबंद पाण्याची विक्री करू शकतो. नागरिकांना अशुद्ध पाणी विकून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करणाºयाविरोधात अन्न, औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी केली जात आहे.

बाटलीबंद पाण्याच्या कंपन्यांचे सॅम्प्लिंग केले जाते. पाण्यासंदर्भात तक्र ारी आलेल्या नाहीत. नागरिकांची तक्र ार आली की आम्ही पाण्याचे सॅम्प्लिंग करून कारवाई करतो.
- डी. संगत,
सहायक आयुक्त,
अन्न, औषध प्रशासन विभाग,
पेण
 

Web Title: Question marks on the purity of the bottled water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.