माणगाव-चांदोरे रस्त्यावर जीवघेण्या खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:30 PM2018-09-05T23:30:27+5:302018-09-05T23:30:37+5:30

म्हसळा-श्रीवर्धन-दिघी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीट चौपदरीकरणाचे काम मागील वर्षी चालू झाले आहे. काम अपुरे राहिल्याने माणगाव-मोर्बा-चांदोरे दरम्यान रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

potholes Empire On Mangaon-Chandore road | माणगाव-चांदोरे रस्त्यावर जीवघेण्या खड्ड्यांचे साम्राज्य

माणगाव-चांदोरे रस्त्यावर जीवघेण्या खड्ड्यांचे साम्राज्य

googlenewsNext

- गिरीश गोरेगावकर

माणगाव : म्हसळा-श्रीवर्धन-दिघी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीट चौपदरीकरणाचे काम मागील वर्षी चालू झाले आहे. काम अपुरे राहिल्याने माणगाव-मोर्बा-चांदोरे दरम्यान रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाºया वाहनचालकांना आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून रोज प्रवास करावा लागतो. त्यातच रस्त्याचे खड्डे बुजविण्यास वारंवार स्टोन क्रशर (ग्रिड)चा वापर करत असल्याने रस्त्यात चिखल होत असून, चिखल दुचाकीस्वार व पादचारी यांच्यावर उडण्याच्या घटना होत आहेत. तसेच दुचाकी गाडी घसरण्याच्या घटना घडत आहेत.
या असंख्य खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासीवर्गाला अनेक प्रकारच्या अस्थी विकारांचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर लोकांच्या वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. हे जीवघेणे भले मोठे खड्डे या महामार्गावरील संभाव्य अपघातांना आमंत्रण देणारे आहेत. संबंधित विभागाकडून खड्डे बुजविण्यासाठी तात्पुरती वरवरची मलमपट्टी केली जाते; परंतु या मलमपट्टीचा काही उपयोग होत नाही. रस्त्यावरील धोका कायम राहात आहे.
कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव आता तोंडावर येऊन ठेपला आहे. या उत्सवकाळात मुंबईतील सर्व चाकरमानी आपापल्या गावी येतात. रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन या विभागातील बहुतांशी चाकरमानी नोकरी-धंद्यानिमित्ताने मुंबईत राहतात. हे सर्व चाकरमानी गणेशोत्सवाला आपापल्या गावी खासगी वाहनांनी आणि एसटी बसने येतात; पण सध्या माणगाव-मोर्बा ते म्हसळा-श्रीवर्धन महामार्गावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडल्याने या महामार्गावरून प्रवास करणाºया वाहनांसह प्रवासी व सर्व गणेशभक्तांना या वर्षी या जीवघेण्या खड्ड्यांचा सामना करावा लागणार असे चित्र आहे. विघ्नहर्ता श्री गणेशाचे देखील याच खड्डेयुक्त रस्त्यावरूनच आगमन होणार आहे.
दरम्यानच्या काळात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी रायगडचा दौरा केला. त्या वेळी ते म्हणाले, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वीच भरले जातील. त्यांच्या या आश्वासनाच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत या महामार्गावरील खड्डे आजही ठाण मांडून आहेत. गणेशभक्तांचे लक्ष हे रस्ते कधी खड्डेमुक्त होतात, याकडे लागून राहिले आहे.
म्हसळा-श्रीवर्धन-दिघी रस्त्याचे काम करणाºया कत्राटदारानेच खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम करणे अपेक्षित आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून त्यास सक्त आदेश सत्वर निगर्मित होणे आवश्यक असल्याचे म्हणणे ग्रमस्थांचे आहे.

Web Title: potholes Empire On Mangaon-Chandore road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड