पेझारी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना पोलिसी धडे

By निखिल म्हात्रे | Published: February 2, 2024 01:24 PM2024-02-02T13:24:17+5:302024-02-02T13:24:23+5:30

हायस्कूलमधील 90हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Police lessons to students of Pezzari High School | पेझारी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना पोलिसी धडे

पेझारी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना पोलिसी धडे

अलिबाग  - शालेय, महाविद्यालयीन स्तरातील विद्यार्थ्यांना पोलिसी शिक्षणाची माहिती मिळावी यासाठी पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्या पुढाकाराने पेझारी येथील नाना पाटील हायस्कूलमधील विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना पोलिसी धडे देण्यात आले. यावेळी पोलिसांच्या कामकाजासह सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यात आली.

वाढत्या सायबर गुन्हेगारीला रोखण्यासाठी शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून सोशल मिडीयाचा गैरवापर, चुकीच्या पोस्ट टाकून होणारा समाजात जातीय तेढ, सायबर गुन्हेगारी अशा अनेक विषयांवर दराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीसांच्या दैनंदिन कामकाजाबाबत माहिती देण्यात आली. या उपक्रमात नाना पाटील हायस्कूलमधील 90हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी पोयनाड पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Police lessons to students of Pezzari High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड