मुरुड पोलिसांमुळे मायलेकराची भेट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 06:59 AM2018-01-06T06:59:52+5:302018-01-06T07:00:14+5:30

- मुरुड शहरातील मसाल गल्ली येथे राहणारा एक अडीच वर्षांचा मुलगा अचानक घरातून गायब झाला. त्याला शोधण्यासाठी घरातील मंडळींनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र त्या मुलाचा शोध लागला नाही.

 Mylikra's visit to Murud police | मुरुड पोलिसांमुळे मायलेकराची भेट  

मुरुड पोलिसांमुळे मायलेकराची भेट  

Next

नांदगाव/मुरुड  - मुरुड शहरातील मसाल गल्ली येथे राहणारा एक अडीच वर्षांचा मुलगा अचानक घरातून गायब झाला. त्याला शोधण्यासाठी घरातील मंडळींनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र त्या मुलाचा शोध लागला नाही. यावेळी मुलाची आई घाय मोकू न रडत होती. मात्र मुरुड पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेला मुलगा आणि आईची भेट झाली.
चेतन महेश मसाल हा अडीच वर्षांचा मुलगा अंगणात व घराच्या परिसरात खेळत असताना अचानक गायब झाला. हा मुलगा चालत चिखलपाखडी नाक्यापर्यंत पोहचला तेथे हा मुलगा सुबुक शेख यांना मिळाला. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली, परंतु काही माहिती मिळाली नाही. त्यांनी कंटाळून या मुलाला मुरु ड पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या हवाली केले. पोलीस निरीक्षक किशोर साळे व उपनिरीक्षक विजय गोडसे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून व्हॉटसअ‍ॅप तसेच बीट मार्शल पोलिसांना प्रत्येक पाखाडीत जाऊन चौकशी करा असे आदेश दिले. त्याप्रमाणे बीट मार्शल प्रत्येक पाखाडीत चौकशी करू लागले त्याप्रमाणे हा मुलगा मसाल गल्लीतील असल्याचे निष्पन्न
झाले.
तातडीने मुलाच्या आईने मुरु ड पोलीस ठाणे गाठून मुलाचा ताबा घेतला. मुरु ड पोलिसांच्या या तत्परतेबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी मुलगा मुरु ड पोलीस ठाण्यात आणून देणारे सुबुक शेख व ठाणे अंमलदार संजीवनी म्हात्रे, नीलिमा वाघमारे, सुरेश वाघमारे, बीट मार्शल अविनाश झावरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 

Web Title:  Mylikra's visit to Murud police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड