विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात, एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 06:43 AM2017-09-11T06:43:26+5:302017-09-11T06:44:24+5:30

दहा वर्षांपूर्वी महापालिकेने आपल्या नियोजन आराखड्यात समावेश केलेला विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात आला आहे. एमएमआरडीएने त्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. दहा कि.मी. लांबीच्या या मार्गावर वाशी खाडीपुलावर दोन कि.मी. लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १२00 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

 MMRDA's ambitious project at Vikhroli-Koparkhareren Khadipool | विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात, एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात, एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

Next

 - कमलाकर कांबळे 
नवी मुंबई : दहा वर्षांपूर्वी महापालिकेने आपल्या नियोजन आराखड्यात समावेश केलेला विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात आला आहे. एमएमआरडीएने त्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. दहा कि.मी. लांबीच्या या मार्गावर वाशी खाडीपुलावर दोन कि.मी. लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १२00 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. २0२१पर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य एमएमआरडीएने ठेवले आहे.
सध्या मुंबई-नवी मुंबई या दोन शहरांना हमरस्त्याने जोडणारे वाशी-मानखुर्द आणि मुलुंड-ऐरोली हे दोन खाडीपूल आहेत. या दोन उड्डाणपुलांवर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. भविष्यातील संभाव्य वाहतूककोंडीचा अंदाज घेऊन दहा वर्षांपूर्वी तिसºया खाडीपुलाचा प्रस्ताव समोर आला होता. महापालिकेने आपल्या नियोजन आराखड्यात या नवीन खाडीपुलाचा समावेश केला होता. राज्य सरकारनेही या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार या पुलाच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची नियुक्ती केली होती. एका खासगी एजन्सीमार्फत या प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने विविध स्तरावर पाहणी करून, हा प्रकल्प अत्यावश्यक असल्याचा अहवाल दिला होता. त्यानुसार आता एमएमआरडीएने या नव्या खाडीपुलाच्या उभारणीसाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. या प्रस्तावित पुलाचा आराखडा तयार करण्यासाठी एमएमआरडीएने बेल्जिएम येथील एन. पी. ब्रिजिंग या कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीने अलीकडेच आपला अहवाल एमएमआरडीएला सादर केल्याची माहिती वरिष्ठ सूत्राने दिली.
मुंबईला पर्यायी शहर म्हणून नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली. या दोन शहरांना जोडण्यासाठी सर्वप्रथम ठाणे खाडीपुलावर मानखुर्द-वाशी उड्डाणपूल उभारण्यात आला. शीव-पनवेल महामार्गावरील अत्यंत मोक्याच्या अशा या उड्डाणपुलामुळे मुंबई-पुणे-गोवा महामार्गावरील प्रवासही सोयीचा झाला. या पुलावरील वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, जुन्या पुलास लागूनच आणखी एक नवा पूल उभारण्यात आला. त्यापाठोपाठ मुलुंड-ऐरोली पुलाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे मुंबईतील मध्य उपनगरे नवी मुंबईच्या जवळ आली. अंधेरी ते बोरीवली यादरम्यान असलेल्या पश्चिम उपनगरांनाही पुणे-गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी ऐरोली-मुलुंड पुलाचा वापर सोयीचा ठरला आहे. या पुलामुळे पूर्व-द्रुतगती महामार्गही नवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आला आहे; परंतु हे दोन्ही खाडीपूल वाहतूककोंडीच्या जंजाळात सापडले असून, भविष्याची मागणी लक्षात घेऊन विक्रोळी- कोपरखैरणे दरम्यान, सुमारे दहा कि.मी. लांबीचा नवीन पूल उभारणीच्या दृष्टीने कार्यवाही सुरू ेकेल्याची माहिती सूत्राने दिली.

विक्र ोळी-घाटकोपर येथून वाशीला लागून असलेल्या कोपरखैरणे उपनगरात हा पूल प्रवेश करणार आहे. त्यानंतर पुढे तो ठाणे-बेलापूर मार्गाला जोडला जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर वाशी खाडीपुलावरील हा तिसरा पूल उपयुक्त ठरणार आहे. घाटकोपर, पवई, विक्रोळी, कांजुरमार्ग आणि भांडुप या विभागातून नवी मुंबई, पनवेलकडे जलद प्रवास करण्यासाठी हा पूल सोयीचा ठरणार आहे.

पर्यावरण विभागाचा अडथळाही दूर

मानखुर्द-वाशी आणि मुलुंड-ऐरोली या दोन खाडीपुलांना मधोमध असा हा पूल उभारला गेल्यास, त्यामुळे सागरी वाहतुकीचे काही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केली होती. त्यासाठी मेरिटाइम बोर्डाची विशेष परवानगी घेण्याचे सूचित करण्यात आले होते.
तसेच खाडीपुलाच्या निर्मितीमुळे विक्रोळी आणि कोपरखैरणे या दोन्ही बाजूंकडील खारफुटीला धक्का लागणार आहे. यापैकी एमएमआरडीएला काही परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.

Web Title:  MMRDA's ambitious project at Vikhroli-Koparkhareren Khadipool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.