358 मशालीच्या प्रकाशात उजळून निघाला प्रतापगड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 12:01 PM2018-10-13T12:01:19+5:302018-10-13T12:12:53+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाने पुनीत झालेल्या किल्ले प्रतापगडावर शुक्रवारी चतुर्थीच्या दिवशी भवानी माता मंदिराला 358 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रात्री 8.30 वाजता गडावर 358 मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. 

mashal mahotsav on pratapgad | 358 मशालीच्या प्रकाशात उजळून निघाला प्रतापगड

358 मशालीच्या प्रकाशात उजळून निघाला प्रतापगड

Next

प्रकाश कदम

पोलादपूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाने पुनीत झालेल्या किल्ले प्रतापगडावर शुक्रवारी चतुर्थीच्या दिवशी भवानी माता मंदिराला 358 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रात्री 8.30 वाजता गडावर 358 मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.  ज्यांच्या नसा नसात शिवभक्ति ठासुन भरली आहे, असे प्रतापगडचे स्थानिक भूमिपुत्र आप्पा उतेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा दैदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून असंख्य शिवभक्त प्रतापगडावर आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्य ढोल पथकाच्या ढोल ताशाच्या ठेक्यावर झाली.

सुमारे दोन तास अत्यंत लयबद्ध स्वरात चाललेले ढोल ताशा समूह वादन ऐकून अवघा शिवभक्त मंत्रमुग्ध झाला. त्यानंतर प्रतापगड वासिनी भवानी मातेच्या मंदिरातून दीप प्रज्वलित करून मशाली प्रकाशमान करण्यात आल्या यावेळी आप्पा उतेकर, माजी सरपंच विजय हवालदार, आनंद उतेकर, संतोष जाधव, भवानी मंदिर व्यवस्थापक परदेशी,यांच्या सहआदि मान्यवर उपस्थित होते. मशाली घेवून मावळे शिवप्रताप बुरुजाकडे सरसावले, संपूर्ण तटबंदीला लावलेल्या मशाली पेटवण्यात आल्या. गडांनी जरी धुक्याची चादर पांघरली असली तरी 358 मशालीच्या उजेडात संपूर्ण प्रतापगड उजळून निघाला.

हे नयनरम्य नेत्रसुखद दृश्य पाहण्यासाठी हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती भाळी..लावुन टिळा कुंकवाचा..पोत नाचवत ..मशाल भणभणवत ..ऐक-ऐक कवडी अर्पित ...आम्ही गोंधळी नाचतो..धन्य होतो त्या आदिशक्तिचरणी..सेवेची ही शिदोरी भरपूर मिळते अशी..शिवबांचा गड प्रतापगड..अग्निवर्षावात फुलुन टाकते हिच ज्वालेची दिवटी जशी. जणू शिवकाळ अवतरल्याची साक्ष देत होती.
किल्ले प्रतापगडावरील जगदंबेच्या मंदिरास सन् 2010 साली 350 वर्षे पूर्ण झाली याचे औचित्य साधुन या मशाल महोत्सवची सुरुवात छ.उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले, शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थित करण्यात आली.

अर्थात ही संकल्पना होती शिवभक्त आप्पा उतेकर यांची. माय भवानी सामाजिक संस्था, शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपुर,  स्वराज्य ढोलपथक, जननीमाता नवरात्रोत्सव समिती  वाडा कुंभरोशी ,सांगली विठा समूह,स्वस्तिक ग्रुप पालघर,प्रताप गड ग्रामस्थ व अनेक संस्था व्  व्यक्ति या कार्यक्रमाला मदत करत असतात. यंदा या कार्यक्रमाचे नवंवे वर्ष ढोल ताशाच्या गजर, पारंपरिक गोंधळ,  फटाकयांची आतिषबाजी, सोहळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त प्रतापगड़ावर उपस्थित होते

Web Title: mashal mahotsav on pratapgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.