वादळाचे थैमान, जिल्ह्यात १४८० हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 03:47 AM2018-10-01T03:47:59+5:302018-10-01T03:48:35+5:30

चक्रिवादळाचा ३,१९६ शेतकऱ्यांना फटका : अलिबागमध्ये ३ घरे पूर्ण, १०८८ घरे अंशत: कोसळली

The loss of rice crop in the district is 1480 hector | वादळाचे थैमान, जिल्ह्यात १४८० हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान

वादळाचे थैमान, जिल्ह्यात १४८० हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान

Next

अलिबाग : चक्रिवादळासह झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा अलिबाग व पेण तालुक्यास बसला आहे. महसूल व कृषी विभागाकडून होत असलेल्या नुकसानभरपाईच्या पंचनाम्यांवरून हे दिसून येत आहे. पंचनाम्यांकरिता तलाठी व कृषी निरीक्षक यांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पेण तालुक्यात शनिवारी झालेल्या सरकारी पंचनाम्यांनुसार १४४ गावांतील तीन हजार १९६ शेतकºयांची एक हजार ४८० हेक्टर क्षेत्रातील भातशेती चक्रिवादळात उद्ध्वस्त झाली आहे, तर ४१ गावांतील एक हजार १४४ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अलिबाग तालुक्यात तीन घरे पूर्णपणे कोसळली आहेत, तर १, ०८८ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. सारळ महसूल मंडळात सर्वाधिक ३८१ घरांचे, तर किहिम महसूल मंडळात ३०६ घरांचे नुकसान झाले असून, या पैकी दोन घरे पूर्णपणे कोसळली आहेत. उर्वरित महसूल मंडळात अलिबागमध्ये एक घर पूर्णपणे कोसळले, तर १२७ घरांचे अंशत: नुकसान झाले, चरी मध्ये १८३, चौलमध्ये ७९, पोयनाडमध्ये ११, तर रामराजमध्ये ११ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, कृषी विभागाकडून महसूल विभागास अद्याप पंचनामे प्राप्त झाले नसल्याने नेमक्या किती हेक्टरातील किती शेतकºयांचे नुकसान झाले, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

आपत्ती निवारणात तरुणाईची आघाडी

१अलिबाग : चक्रिवादळाच्या तडाख्याने निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थ आणि नागरिकांच्या मदतीकरिता गावागावांतील तरुणाईने पुढाकार घेतला आहे. गुरुवारी चक्रिवादळामुळे वीज वितरण कंपनीचे अलिबाग तालुक्यात ९० तर पेण तालुक्यात २५० वीज खांब जमीनदोस्त झाले होते.
२शुक्रवारी हे सर्व वीज खांब पुन्हा उभे करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे मोठे आव्हान वितरण कंपनीचे अभियंते, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या समोर होते. गुरुवारी रात्रभर अंधारात राहिलेल्या अलिबाग व पेणवासीयांचा संभाव्य रोष आणि अपुरे मनुष्यबळ या पार्श्वभूमीवर हे सर्व काम कसे होणार, अशी चिंता वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना असतानाच सर्वच ठिकाणी तरुण मंडळी स्वेच्छेने सहकार्य करण्यास पुढे आली, त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला.
३अलिबाग जवळच्या पवेळे गावात मुख्य विद्युत वाहिनीवर पडलेली झाडे तोडल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत सुरू करता येणार नाही आणि त्याकरिता वितरण कंपनीकडे मनुष्यबळ उपलब्ध नव्हते, त्यामुळे परिसरात वीजपुरवठा पूर्ववत होण्याकरिता तीन दिवस जातील, अशी परिस्थिती होती.

रोह्यात घर कोसळल्याने सहा जण किरकोळ जखमी
च्रोहा तालुक्यात तलाठी सजा खांब मधील मौजे वैजनाथ व खांब येथे रविवारी परतीच्या पावसामुळे घरांचे नुकसान झाले. मात्रकुठलीही जीवितहानी झालेली नाही
च्तळा येथे वादळी पाऊसामुळे तीन घरांचे पत्रे व कौल उडाली. माणगाव तालुक्यातील निजामपूर बोरवाडी रस्त्यावर वादळामुळे झाडे कोसळली, जेसीबीद्वारे झाडे हटविण्यात येत आहेत.
च्रोहा तालुक्यात किल्ला गावात घर कोसळून सहा जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू आहे.

च्पवेळे गावातील भरत मानकोले, प्रशांत वारीक, संकेत पाटील, शुभम मानकोले, प्रतीक पाटील, प्रसाद मानकोले, अनिल नेमण, विकास मानकोले, विनिकेत मानकोले, हर्षल बिहरोलकर, प्रणित मळेकर या ११ तरुणांनी कुºहाडी-कोयते आणून,

च्सकाळी १० ते दुपारी २ अशा चार तासांत वीजवाहिनीवर पडलेली मोठी २० ते २२ झाडे तोडली. त्यामुळे वितरण कंपनीच्या लाइनमनला काम करणे सोयीचे झाले आणि दुपारी तीन वाजता पवेळे गाव परिसरातील सर्व घरांत वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.

Web Title: The loss of rice crop in the district is 1480 hector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.