तरुणांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या प्रवाशाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 06:39 AM2018-12-26T06:39:54+5:302018-12-26T06:40:53+5:30

खोपोली रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री धावत्या लोकलमधून पडून प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या प्रवाशाचे प्राण पाच तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचले.

 The life of a stranded stranger caught in the platform, read by the youth's dissatisfaction | तरुणांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या प्रवाशाचे प्राण

तरुणांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या प्रवाशाचे प्राण

Next

खोपोली : खोपोली रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री धावत्या लोकलमधून पडून प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या प्रवाशाचे प्राण पाच तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचले.
रितेश सिंघ, प्रज्वल फाळे, प्रियांशू फाळे, अभिषेक भोसले, अमित पांडे हे पाच जण रात्री ११.२० लोकल पकड होते. या वेळी अमीत शेडगे (२६, रा.शेडवली) या तरुणचा पाय निसटला व तो लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडला. त्याचवेळी त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी त्याचा हात घट्ट पकडला व लोकल पास होईपर्यंत अमितला पकडून ठेवले. अमित शेडगे याने मद्यप्राशन केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अमितच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली असून, त्याला एम.जी.एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title:  The life of a stranded stranger caught in the platform, read by the youth's dissatisfaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.