शेवटच्या दिवशी ११४ नामनिर्देशनपत्रे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 03:40 AM2019-01-10T03:40:31+5:302019-01-10T03:41:21+5:30

बुधवार २ ते ९ जानेवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी होता. शेवटच्या दिवशी बुधवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करायची होती.

On the last day 114 nominations filed | शेवटच्या दिवशी ११४ नामनिर्देशनपत्रे दाखल

शेवटच्या दिवशी ११४ नामनिर्देशनपत्रे दाखल

Next

कर्जत : नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २७ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या ९ जानेवारी अखेरच्या दिवशी शेवटच्या मुदतीपर्यंत २३५ जणांनी आॅनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी नगराध्यक्षपदासाठी सहा आणि नगरसेवकपदासाठी १०८ असे एकूण ११४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

बुधवार २ ते ९ जानेवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी होता. शेवटच्या दिवशी बुधवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करायची होती. अजून युती किंवा आघाडी निश्चित नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, मनसे, बसपा, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, काँग्रेस, शेकाप, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या आदी पक्षाच्या उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

बुधवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शक्तिप्रदर्शन करीत आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतीक्षा सुरेश लाड, प्राची भगवान भोईर, शिवसेनेच्या वतीने सुवर्णा केतन जोशी, पूनम प्रल्हाद बोबडे आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या शिल्पा सचिन भालेराव यांनी आपले नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बोंबले यांच्याकडे दाखल केले.
 

Web Title: On the last day 114 nominations filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.