जिल्ह्यात विठू नामाचा गजर; खोपोली-साजगाव बोंबल्या विठोबाच्या जत्रेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:00 AM2018-11-20T00:00:49+5:302018-11-20T00:01:40+5:30

कार्तिक एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील सुमारे २१८ मंदिरांमध्ये विठू नामाचा गजर करण्यात आला. सोमवारी पहाटे विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजा करण्यात आली. मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केली होती.

Khopoli-Sajgaon Bombayla Vithoba's Jatra begins | जिल्ह्यात विठू नामाचा गजर; खोपोली-साजगाव बोंबल्या विठोबाच्या जत्रेला सुरुवात

जिल्ह्यात विठू नामाचा गजर; खोपोली-साजगाव बोंबल्या विठोबाच्या जत्रेला सुरुवात

googlenewsNext

अलिबाग : कार्तिक एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील सुमारे २१८ मंदिरांमध्ये विठू नामाचा गजर करण्यात आला. सोमवारी पहाटे विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजा करण्यात आली. मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केली होती.
कार्तिकी एकादशीच्या दिवशी खोपोली-साजगाव येथील बोंबल्या विठोबाची जत्रा सुरू झाली आहे. त्यानंतर अलिबाग वरसोली आणि दत्ताच्या जत्रा पार पडणार असल्याने जिल्ह्यात जत्रांच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भक्तिमय आणि उत्साहात कार्तिकी एकादशी साजरी करण्यात आली. अलिबाग शहराजवळच्या वरसोली येथील प्राचीन आंग्रेकालीन विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. खोपोली-साजगाव जत्रा १९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर अशी सलग १५ दिवस सुरू राहणार आहे.
भाविकांची गर्दी आणि जिल्ह्यात विविध ठिकाणचा जत्रोत्सव पाहता, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकादशीच्या आदल्या दिवसापासून मंदिर व्यवस्थापनाने जय्यत तयारीला सुरवात केली होती. मंदिरांमध्ये विठ्ठल-रु क्मिणीची पूजा झाल्यावर मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली.

मंदिरांसमारे तुळशीमाळा विक्रेत्यांची गर्दी
श्रीविठ्ठल-रु क्मिणीला तुळस प्रिय असल्याने ठिकठिकाणच्या मंदिरासमोर तुळशीच्या माळा विकणाऱ्यांचीही गर्दी झाल्याचे दिसून आले. काही मंदिरांमध्ये भजनासह कीर्तनाच्या कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाºया खालापूर तालुक्यातील साजगावचे श्रीविठ्ठल मंदिर आणि अलिबागजवळील वरसोली येथील आंग्रेकालीन श्रीविठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.
गावोगावच्या श्रीविठ्ठल मंदिरातही भाविकांची गर्दी झाली होती. वरसोलीच्या आंग्रेकालीन श्रीविठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशी सोहळ्याचे आयोजन केले गेले आहे. या मंदिरात देवस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश नाईक आणि मनीषा नाईक या दाम्पत्याने विठ्ठल-रु क्मिणीची विधिवत पूजा केली.
विविध जत्रांचा कालावधी
१९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर खोपोली-साजगाव जत्रा
३ डिसेंबर ते ८ डिसेंबर अलिबाग-वरसोली जत्रा
२२ डिसेंबर २७ डिसेंबर अलिबाग-चौल दत्त यात्रा

पेझारी येथील १२४ वर्षे जुन्या मंदिरात उत्सव
कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त भाविक ांची गर्दी झाली. १२४ वर्षांपूर्वीचे हे पवित्र स्थान आहे आणि तेव्हापासून येथील ग्रामस्थ उत्सव साजरा करतात. त्यानिमित्त पंचक्रोशीतील भाविक या विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतात. तसेच कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने देवाची विधिवत पूजा करून भजनांचे आयोजन करून उत्सव आनंदात साजरा करण्यात आहे.

ताकईतील धाकटी पंढरी दुमदुमली
१खोपोली : संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया ताकई येथील विठ्ठल मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. खोपोली शहरापासून ४ कि.मी.अंतरावर ताकई येथे पुरातन काळातील मंदिर असून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज याठिकाणी मिरचीचा व्यापार करण्यासाठी येत असत.
२येथील लोकांनी पैसे बुडविल्याने तुकाराम महाराजांनी टेकडीवर बोंबा मारून पांडुरंगाचा धावा केला असता साक्षात पांडुरंगाने तुकाराम महाराजांचे पैसे गोळा करून दिले व तेथूनच बोंबल्या विठोबा असे नाव प्रसिद्ध झाल्याची आख्यायिका आहे.

नागोठण्यात हरिपाठासह भजनांचे आयोजन
१नागोठणे : प्रबोधिनी तथा कार्तिकी एकादशी येथील ज्ञानेश्वर मंदिरात धार्मिक वातावरणात संपन्न झाली. पहाटे ४ वाजता काकड आरतीने कार्यक्र माचा शुभारंभ करण्यात आला. ५ वाजता मंदिरातील विठ्ठल - रखुमाईच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले.
२दुसºया सत्रात सकाळी साडेनऊ ते दुपारी एकचे दरम्यान नागोठणेसह पंचक्र ोशीतील वारकरी मंडळींच्या भजनाचा कार्यक्र म घेण्यात आला. शेवटच्या सत्रात सायंकाळी सात वाजता नागोठणेतील वारकरी मंडळींच्या हरिपाठानंतर दिवसभराच्या कार्यक्र माची सांगता झाली. दिवसभरात शेकडो भाविकांनी मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले.

Web Title: Khopoli-Sajgaon Bombayla Vithoba's Jatra begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड