कर्जत ग्रा. पं. निवडणूक : चौथ्या दिवसापर्यंत १४० अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 03:15 AM2019-02-08T03:15:34+5:302019-02-08T03:15:56+5:30

कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवार, २४ फेब्रुवारी रोजी जाहीर झाल्या आहेत.

Karjat GR Pt Election: 140 applications till the fourth day | कर्जत ग्रा. पं. निवडणूक : चौथ्या दिवसापर्यंत १४० अर्ज दाखल

कर्जत ग्रा. पं. निवडणूक : चौथ्या दिवसापर्यंत १४० अर्ज दाखल

Next

कर्जत : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवार, २४ फेब्रुवारी रोजी जाहीर झाल्या आहेत. आजच्या चौथ्या दिवशी सरपंचपदासाठी १४ नामनिर्देशपत्र तर सदस्य पदासाठी ६५ अशी ७९ नामनिर्देशपत्र दाखल झाली आहेत. गुरुवार, ७ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत एकूण १४० नामनिर्देशपत्र दाखल झाली आहेत. त्यामध्ये सरपंचपदासाठी २४ तर सदस्यपदासाठी ११६ नामनिर्देशपत्र दाखल झाली आहेत.

अशी दोन्ही मिळून १४० नामनिर्देशपत्र दाखल झाली आहेत. मार्च २०१९ मध्ये आठ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. तालुक्यातील भालीवडी, हालीवली, ममदापूर, पळसदरी, खांडपे, चिंचवली, किरवली, सावेळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भालीवडी ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदासाठी २० तर सरपंचपदासाठी दोन नामनिर्देशपत्र दाखल, हालीवलीमध्ये सदस्यपदासाठी चार, तर सरपंचपदासाठी एक ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदासाठी २४ तर सरपंचपदासाठी तीन नामनिर्देशपत्र दाखल झाले आहेत.

पळसदरीमध्ये सदस्यपदासाठी १४, सरपंचपदासाठी १०, खांडपे ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदासाठी ३३ तर सरपंचपदासाठी पाच, चिंचवली ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदासाठी सात, सरपंचपदासाठी एकही नामनिर्देशपत्र दाखल नाही.

किरवली ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदासाठी चार तर सरपंचपदासाठी दोन, सावेळे ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदासाठी दहा तर सरपंचपदासाठी एक नामनिर्देशपत्र दाखल झाल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागातून देण्यात आली आहे.

Web Title: Karjat GR Pt Election: 140 applications till the fourth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड