अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेचे पालन करणे गरजेचे - जी. एम. मुजावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 03:54 PM2023-11-05T15:54:29+5:302023-11-05T15:55:02+5:30

मधुकर ठाकूर  उरण : प्रत्येक विद्यार्थ्यी, नागरिकांनी अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेचे पालन करणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन न्हावा-शेवा वाहतूक शाखेचे ...

It is necessary to follow road safety to avoid accidents - G. M. Mujavar | अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेचे पालन करणे गरजेचे - जी. एम. मुजावर

अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेचे पालन करणे गरजेचे - जी. एम. मुजावर

मधुकर ठाकूर 

उरण : प्रत्येक विद्यार्थ्यी, नागरिकांनी अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेचे पालन करणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन न्हावा-शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी केले आहे.

न्हावा-शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी उलवे नोड येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाला भेट देऊन शिक्षक, विद्यार्थी यांच्या बरोबर रस्ता सुरक्षेबाबत संवाद साधत रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी पुढे सांगितले की, गेल्या काही वर्षांत वेग आणि रस्ता सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्ते अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जी चिंताजनक बाब आहे.

आज प्रत्येकजण घाईचे आयुष्य जगतो आहे.वेगाने वाहन चालवून रहदारी नियमांचे पालन करीत नाहीत. या सर्व कारणांमुळे व्यक्तीला बर्‍याच वेळा आपला जीव गमवावा लागला आहे किंवा अपंग झाल्याने त्याचा त्रास आयुष्यभर कुटुंबातील सदस्यांना सहन करावा लागला आहे.तरी प्रत्येक विद्यार्थ्यानी वाहतूक सुरक्षिततेबाबत शासनाने केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.त्यामुळे रस्त्यावर मोटारसायकल,फोर व्हीलर चालवताना अपघात होणार नाही.जेणे करुन आपल जीवन सुरक्षित राहणार आहे. असे शेवटी त्यांनी नमुद केले. यावेळी विद्यार्थ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांच्याशी इतर कायद्याचे ही माहिती करून घेतली.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच वाहतूक पोलीस शाखेचे पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: It is necessary to follow road safety to avoid accidents - G. M. Mujavar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.