नापीकऐवजी ‘ओसाड’चे शिक्के, शेतकऱ्यांच्या सात-बारावर नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 03:10 AM2018-06-06T03:10:42+5:302018-06-06T03:10:42+5:30

तालुक्यातील खारेपाटात उधाणामुळे संरक्षक बंधारे फुटल्याने समुद्राचे खारे पाणी भातशेतीत घुसून ती नापीक झाली आहे. मात्र, नुकसान झालेल्या शेतकºयांच्या सात-बारा उताºयांवर महसूल विभागाने ‘नापीक’ऐवजी ‘ओसाड’शेती असे शिक्के मारले आहेत.

 Instead of barter, the 'sewage' stamps, farmers' seven-twelve entries | नापीकऐवजी ‘ओसाड’चे शिक्के, शेतकऱ्यांच्या सात-बारावर नोंदी

नापीकऐवजी ‘ओसाड’चे शिक्के, शेतकऱ्यांच्या सात-बारावर नोंदी

Next

- जयंत धुळप

अलिबाग : तालुक्यातील खारेपाटात उधाणामुळे संरक्षक बंधारे फुटल्याने समुद्राचे खारे पाणी भातशेतीत घुसून ती नापीक झाली आहे. मात्र, नुकसान झालेल्या शेतकºयांच्या सात-बारा उताºयांवर महसूल विभागाने ‘नापीक’ऐवजी ‘ओसाड’शेती असे शिक्के मारले आहेत. परिणामी, शेतकºयांना शासनाने नुकसानभरपाई मंजूर केली तरी ती मिळू शकत नसल्याचे समोर येत आहे. महसूल विभागातील तलाठी आणि मंडळ अधिकारी संगनमताने ‘ओसाड’ शिक्के मारण्याचे कारस्थान करीत असल्याचा दावा श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी केला आहे.
शासनाच्या नव्या औद्योगिक धोरणानुसार, औद्योगिक कारखाने वा अन्य प्रकल्पाकरिता शेतकºयांच्या ‘ओसाड’ शेतजमिनी संपादित करता येतात. मात्र, ‘नापीक’ शेतजमिनी संपादित करता येत नाहीत. खारेपाटातील जमिनींवर ‘ओसाड’ शिक्के मारल्यावर, त्यातील पिकाची वा जमिनीची नुकसानी कोणत्याही कारणास्तव झाल्यास शेतकºयाला शासकीय नुकसानभरपाई मिळू शकत नाही, अशी कायदेशीर तरतूद आहे. परिणामी, शेतकरी कंटाळून कवडीमोल किमतीला जमीन विकण्याच्या मानसिकतेला येतो. अशा प्रकारे जमिनी विकून भूमिहीन झालेले अनेक शेतकरी परिसरात आहेत. वरिष्ठ पातळीवर चाललेले हे मोठे कारस्थान असल्याचे भगत यांनी सांगितले.
मे २०१६ मध्ये उधाणाच्या भरतीने बंधारे फुटून खारे पाणी भातशेतीमध्ये घुसल्याने अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील ५४० शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून नुकसानीची भरपाई मिळावी, याकरिता नुकसानग्रस्त शेतकºयांनी १६ मे २०१६ रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते.
नुकसानग्रस्त शेतकºयांची मागणी मान्य करून, २६ मे २०१६ रोजी संयुक्त बैठक खारभूमी विभागाच्या अलिबाग कार्यालयात झाली. बैठकीस श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक भगत व शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह महसूल विभागाच्या वतीने नायब तहसीलदार लता गुरव व सुविधा पाटील, कृषी खात्याच्या कृषी पर्यवेक्षक नीलिमा वसावे, खारभूमी विभागाचे सहा. कार्यकारी अभियंता एस. पी. पवार, शाखा अभियंता सु. ज. शिरसाठ व एन. जी. पाटील हे उपस्थित होते.

‘ओसाड’ जमिनीला नुकसानभरपाई नाही
खारेपाटातील शेतकºयांच्या सात-बारा उताºयावर ‘ओसाड’ शिक्का मारल्याबाबत शेतकºयांनी विचारणा केली असता, ‘ओसाड’ आणि ‘नापीक’ यातील फरक स्पष्ट करण्यात आला. ज्या जमिनीत कधीही पीक घेतले नाही ती जमीन ‘ओसाड’ तर पूर्वी सुपीक होती, त्यात पीक घेतले जात असे; परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे आता पीक घेता येत नाही, अशी जमीन म्हणजे ‘नापीक’अशी व्याख्या नायब तहसीलदार लता गुरव यांनी स्पष्ट केली.
खारेपाटातील मेढेखार, काचळी, पिटकरी, कातळपाडा या गावांतील या ५४० शेतकºयांनी नुकसानभरपाईकरिता अर्ज दाखल केले आहेत. मात्र, या शेतकºयांच्या सात-बारा उताºयांवर ‘ओसाड’ शिक्के असल्याने नुकसानभरपाई मिळू शकणार नसल्याचे नायब तहसीलदार गुरव यांनी स्पष्ट केले.

शिक्का बदलण्याचे अधिकार जमाबंदी आयुक्तांना
५४० शेतकºयांच्या पिकत्या शेतजमिनी समुद्र संरक्षक बंधारे फुटण्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे ‘नापीक’ झाल्या आहेत. परिणामी, सात-बारावरील ‘ओसाड’चे शिक्के बदलून ‘नापीक’चे मारून मिळावेत, अशी मागणी शेतकºयांनी केली.
शासनाच्या सात-बारा उतारा नोंदीच्या आॅनलाइन सॉफ्टवेअरमध्ये ‘एडिट’मोड (बदल करण्याची सुविधा) नसल्याने ‘ओसाड’ शिक्क्याचा ‘नापीक’ असा बदल करता येऊ शकत नसल्याचे नायब तहसीलदार गुरव यांनी सांगितले.
सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे अधिकार राज्याच्या जमाबंदी आयुक्तांना असल्याने, रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भारत शितोळे यांनी जमाबंदी आयुक्तांना या बदलाबाबतचे पत्र २५ मार्च २०१८ रोजी पाठविले आहे.

‘विशेष बाब’ म्हणून आर्थिक मदत
मंजूर करण्याचा अहवाल
गेल्या २१ फेब्रवारी २०१८ रोजी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाचे अवर सचिव यांना खारेपाटातील शेतकºयांना विशेष बाब म्हणून आर्थिक मदत मंजूर करण्यास कोणतीही अडचण नाही, असे सकारात्मक पत्र पाठवून कळविले आहे.
केंद्र शासनाच्या निकषामध्ये ‘समुद्राचे उधाण’याचा नैसर्गिक आपत्तीत समावेश केला आहे. खारभूमी विभागाने संरक्षक बंधारे न बांधणे, त्यांची देखभाल न करणे, यामुळे शेतीत खारे पाणी जाऊन नुकसान झाल्याने व नुकसानग्रस्त बाधित व्यक्तींना नुकसानभरपाईची रक्कम देय होत नसल्याने या प्रकरणी ‘विशेष बाब’म्हणून आर्थिक मदत मंजूर होण्यासाठी २६ डिसेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागीय आयुक्तांना दिलेल्या अहवालात नमूद केले.

Web Title:  Instead of barter, the 'sewage' stamps, farmers' seven-twelve entries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड