सोशल नेटवर्किंग साइट्समुळेच गुन्ह्यांमध्ये वाढ : ‘कार्यालयीन मन स्वास्थ्य’ कार्यक्र माचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 02:19 AM2017-10-13T02:19:07+5:302017-10-13T02:19:23+5:30

आजच्या स्पर्धेच्या युगात तणावाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, यातच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, मेट्रोमोनी या व इतर सोशल नेटवर्किंग साइट्समुळे होणारे गुन्हे याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन

 Increase in crime due to social networking sites: Organizing 'Office Mental Health' program | सोशल नेटवर्किंग साइट्समुळेच गुन्ह्यांमध्ये वाढ : ‘कार्यालयीन मन स्वास्थ्य’ कार्यक्र माचे आयोजन

सोशल नेटवर्किंग साइट्समुळेच गुन्ह्यांमध्ये वाढ : ‘कार्यालयीन मन स्वास्थ्य’ कार्यक्र माचे आयोजन

Next

विशेष प्रतिनिधी 
अलिबाग : आजच्या स्पर्धेच्या युगात तणावाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, यातच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, मेट्रोमोनी या व इतर सोशल नेटवर्किंग साइट्समुळे होणारे गुन्हे याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन रायगड जिल्हा सायबर क्राइम शाखेचे पोलीस निरीक्षक शिव स्वामी यांनी केले आहे. जगभरात सोशल मीडियाचा चांगला आणि वाईट असा दोन्ही प्रकारे वापर केला जात आहे, मात्र सोशल नेटवर्किंग साइट्समुळेच गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याचे अनेक उदाहरणे देवून त्यांनी विषद केले.
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मानसिक स्वास्थ्य विभाग, जिल्हा सामान्य रु ग्णालय अलिबाग ङ्क्त रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कार्यालयीन मन स्वास्थ्य’ या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळेस शिव स्वामी बोलत होते.
डॉ. अर्चना सिंग यांनी वाढत्या मोबाइल वापर आणि त्यातून निर्माण होणारे तणाव, शारीरिक स्वास्थ्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संजीवनी नाईक यांनी दैनंदिन जीवनातील सवयी आणि आजच्या दैनंदिन जीवनात सोशल मीडियामुळे झालेले चांगले आणि वाईट बदल या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
केले.
यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अर्चना सिंग, अ‍ॅड. नीता तुळपुळे, विशाल दामोदर, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संजीवनी नाईक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस. कार्यक्र म अधिकारी प्रा. प्राजक्ता कवी यांनी तर प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्र माचे अधिकारी प्रा. रविंद्र पाटील यांनी केले.

Web Title:  Increase in crime due to social networking sites: Organizing 'Office Mental Health' program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.