अलिबाग पर्यटन महोत्सव, जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 03:47 AM2017-12-24T03:47:05+5:302017-12-24T03:47:12+5:30

अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचे स्थान आहे. येथे पर्यटन केंद्रित प्रत्येक गोष्ट आहे. निसर्गाने नटलेला परिसर, इतिहास, समुद्रकिनारा असे एकमेव द्वितीय पर्यटनस्थळ अलिबाग आहे. स्थानिकांच्या रोजगाराचे मुख्य स्रोत म्हणून येथील पर्यटन सुविधांचा विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी येथे केले.

Inauguration of the Alibag Tourism Festival, Jayakumar Rawal | अलिबाग पर्यटन महोत्सव, जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

अलिबाग पर्यटन महोत्सव, जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

Next

अलिबाग : अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचे स्थान आहे. येथे पर्यटन केंद्रित प्रत्येक गोष्ट आहे. निसर्गाने नटलेला परिसर, इतिहास, समुद्रकिनारा असे एकमेव द्वितीय पर्यटनस्थळ अलिबाग आहे. स्थानिकांच्या रोजगाराचे मुख्य स्रोत म्हणून येथील पर्यटन सुविधांचा विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी येथे केले.
अलिबाग नगरपरिषद, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महिला बचतगट फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अलिबाग पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जयकुमार रावल बोलत होते. या वेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, रघुजीराजे आंग्रे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षा चित्रेलखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना रावल पुढे म्हणाले, अलिबागाला पर्यटनाच्या दृष्टीने आगळे-वेगळे महत्त्व आहे. याकरिता पर्यटन क्षमतेचा विकास करणे आवश्यक आहे. अलिबाग सारख्या पर्यटनस्थळी पर्यटन हेच रोजगाराचे मुख्य स्रोत आहे. वेगवेगळ्या विभागात पर्यटन विभागले आहे. शासनाने किल्ले संवर्धन हे नवीन धोरण आणले आहे. रायगड किल्ल्याला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी शासनाने ६0६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Inauguration of the Alibag Tourism Festival, Jayakumar Rawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड