नोटाला जास्त मते मिळाल्यास पुन्हा होणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:15 AM2019-01-02T00:15:16+5:302019-01-02T00:15:31+5:30

निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम मशिन वापरण्यात येते. या मशिनमध्ये नोटा असतो. मात्र, या पर्यायाला जास्त मते प्राप्त झाल्यास त्या पदाची निवडणूक पुन्हा घेण्यात येईल, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे.

 If the vote gets more votes then the elections will be held again | नोटाला जास्त मते मिळाल्यास पुन्हा होणार निवडणूक

नोटाला जास्त मते मिळाल्यास पुन्हा होणार निवडणूक

Next

कर्जत : निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम मशिन वापरण्यात येते. या मशिनमध्ये नोटा असतो. मात्र, या पर्यायाला जास्त मते प्राप्त झाल्यास त्या पदाची निवडणूक पुन्हा घेण्यात येईल, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे.
पूर्वी निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर होत होता. आता मात्र, मतदान प्रकियेत वेगवेगळे बदल होत आहेत. ईव्हीएम मशिनद्वारे निवडणूक प्रक्रि या होत आहे. मात्र, त्या बाबत अनेक तक्रारी येऊ लागल्याने आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनच्या बरोबर व्होट व्हेरिफाइड पेपर एडिटर ट्रायल (व्हीव्हीपॅट) यंत्राचा पहिल्यांदाच वापर करण्यात येणार आहे. ईव्हीएमवर बटण दाबल्यानंतर एक चिठ्ठी बाहेर पडते, त्यावर मतदान केलेल्या उमेदवाराचे नाव, क्र म आणि निवडणूक चिन्ह दिसते. या पद्धतीचा अवलंब आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये प्रथमच केला जाणार आहे.
निवडणुकीत पारदर्शकता आणण्याकरिता मुख्य निवडणूक आयोगाने ही मोहीम हाती घेतली आहे. व्हीव्हीपॅट मतदान प्रणालीमुळे कोणाला मतदान केले आहे, हे मतदाराला समजू शकणार आहे. मतदाराला त्याचे मत आपल्या पसंतीच्या उमेदवारालाच पडले आहे याची खात्री करून घेता येणार आहे.
ईव्हीएम मशिनवर असलेल्या मतपत्रिकेवरील कोणताच उमेदवार मतदारांच्या पसंतीचा नसल्यास त्यांना बॅलेट युनिटवरील नोटा या पर्यायासमोरील बटण दाबण्याचा पर्याय स्वीकारता येतो. मतपत्रिकेवरील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवारांपेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मते प्राप्त झाल्यास त्या पदाची निवडणूक नामनिर्देशापासून पुन्हा घेण्यात येणार आहे. पुन्हा घेतलेल्या निवडणुकीमध्ये नोटाला मिळालेल्या मतांचा विचार न करता, ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते प्राप्त होतील त्या उमेदवारास विजयी म्हणून घोषित करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशाच्या प्रसिद्धिपत्रकात दिली आहे.

नगरपरिषद निवडणुकीत अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
कर्जत : कर्जत नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २७ जानेवारी रोजी आहे. बुधवार, २ ते ९ जानेवारीपर्यंत नामनिर्देशपत्र भरण्याचा कालावधी आहे. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र व शपथपत्र संगणक प्रणालीवर भरायची आहेत. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरण्यासाठी वेबसाइट २ जानेवारी सकाळी ११ ते ९ जानेवारी दुपारी २ या कालावधीत सुरू राहणार आहे. वेबसाइटवर उमेदवार रजिस्ट्रेशन करून लॉगइन करावे लागणार आहे. यावर नामनिर्देशन पत्र व शपथपत्र भरून नामनिर्देशनपत्राची तपासणी करून आवश्यक असल्यास त्यात दुरु स्ती करू शकतात. नामनिर्देशनपत्र व शपथपत्र यांची प्रिंटाउट घेऊन आवश्यक त्या ठिकाणी स्वाक्षºया करून संबंधित निवडणूक अधिकाºयांकडे विहित कालावधीत सादर करावी लागणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली.

Web Title:  If the vote gets more votes then the elections will be held again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Karjatकर्जत