गीते-तटकरे यांच्यात रायगडमध्ये थेट लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:53 PM2019-03-14T23:53:27+5:302019-03-14T23:53:47+5:30

रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे व युतीचे अनंत गीते यांच्यातच सरळ लढत होणार आहे.

Gite-Tatkare fight directly between Raigad | गीते-तटकरे यांच्यात रायगडमध्ये थेट लढत

गीते-तटकरे यांच्यात रायगडमध्ये थेट लढत

Next

आगरदांडा : रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे व युतीचे अनंत गीते यांच्यातच सरळ लढत होणार आहे. आचारसंहितेपूर्वीच या दोन्ही उमेदवारांनी थेट जनसंपर्कावर भर दिला आहे. या मतदारसंघातून सातत्याने यशाच्या पुनरावृत्तीचे आव्हान अनंत गीते यांच्यासमोर असून रायगड यंदा काबीज करायचा या इराद्याने सुनील तटकरे यांनी रणनीती आखली आहे.

तब्बल सहा वेळा अनंत गीते शिवसेनेकडून निवडून जात आहेत. पूर्वीच्या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातही शिवसेनेने दबदबा कायम ठेवला होता. या दबदब्याला २००९ च्या निवडणुकीत प्रथमच सुरुंग लावण्याचा तटकरेंचा प्रयत्न असफल झाला. २००९ च्या निवडणुकीत गुहागरपासून अलिबागपर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण मतदारसंघात अनंत गीते यांना ३ लाख ९६ हजार १७८ मते मिळाली तर सुनील तटकरे यांना ३लाख ९४ हजार ६८ मते मिळाली.

२०१९च्या निवडणुकीची रणनीती तटकरे यांनी पाच वर्षांपासूनच आखण्यास सुरु वात केली होती. त्याचा लाभ त्यांना मिळू शकतो. तटकरे यांची जमेची बाजू म्हणजे, या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक तीन आमदार भास्कर जाधव, संजय कदम व अवधूत तटकरे यांच्या रूपाने त्यांच्याकडे आहेत. अलिबाग व पेण येथे शेकाप पक्षाचे पंडित पाटील व धैर्यशील पाटील या दोन आमदारांची रसद त्यांना मिळू शकते. याउलट गीते यांच्याकडे केवळ महाड-पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांचीच साथ असणार आहे. मात्र, असे असले तरी शिवसेनेचे मजबूत संघटन व भाजपाची साथ गीते यांची जमेची बाजू आहे. गुहागरपासून अलिबागपर्यंत शिवसेनेचे खोलवर असलेले जाळे शिवाय मागील निवडणुकीत गीते यांना अंतर्गत बेबनावाचा फटका बसला होता. यावेळी मात्र अंतर्गत बंडाळीचे आव्हान गीते यांच्यासमोर नसणार आहे. शिवाय दापोली, खेड, मंडणगडमधून गीते यांना मोठे मताधिक्य देण्याची सिद्धता रामदास कदम यांनी केली आहे.

दोन्ही नेते सज्ज
गीते व तटकरे ही लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. गीते यांचा कुणबी फॅक्टर मजबूत राहिलेला नाही.
युती असताना व मोदी यांची लाट असतानाही २०१४ मध्ये तटकरे यांनी गीते यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी रायगड काबीज करण्यासाठी दोन्हीही नेते सज्ज झाले आहेत.

Web Title: Gite-Tatkare fight directly between Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.