रेल्वेसाठी आरसीएफची जुनीच लाइन सोयीस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:51 PM2019-01-28T23:51:39+5:302019-01-28T23:51:51+5:30

२३५ कोटींच्या खर्चाला तत्वत; मान्यता : केंद्रीय मंत्र्यांची वरसोली गावाला भेट

Flexible line of RCF line for convenience | रेल्वेसाठी आरसीएफची जुनीच लाइन सोयीस्कर

रेल्वेसाठी आरसीएफची जुनीच लाइन सोयीस्कर

Next

अलिबाग : अलिबागकरांसाठी बहुप्रतीक्षेत असलेल्या रेल्वेसाठी नव्याने जमिनीचे संपादन करण्यात येणार नाही, मात्र आरसीएफ कंपनीच्या रेल्वे लाइनवरूनच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. जुन्या रेल्वे मार्ग जोडणीला तब्बल २३५ कोटी रुपयांच्या खर्चाला रेल्वे मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिली.

अलिबाग तालुक्यातील पर्यटकांसाठी प्रकाशझोतात आलेल्या वरसोली या पर्यटनस्थळाची पाहणी गीते यांनी केली. वरसोली गावात आवश्यक असलेल्या जेटीचा नव्याने विकास करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री गावात आल्याचे कळताच नागरिकांनी त्यांची भेट घेतली. गावात भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा पाढाच त्यांनी गीते यांच्यासमोर वाचला. वरसोली गावातील सी.आर.झेड, मच्छीमारांचे विविध प्रश्न, रेल्वे संदर्भात असलेल्या नागरिकांच्या प्रश्नांचे निरसन अनंत गीते यांनी केले. मच्छीमारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या त्रैमासिक बैठकीत त्यावर लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याचे गीते यांनी उपस्थितांना सांगितले.
येथे कोळी समाज हा मोठ्या संख्येने आहे. त्यांची बहुतांश घरे आणि मासळी सुकवण्याचे ओटे हे समुद्र किनारीच आहेत. सीआरझेड कायदा हा त्यांच्यासाठी जाचक ठरत आहे. या समाजाची येथे पूर्वीपासूनची घरे आहेत. सरकार, प्रशासन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. उलट त्यांच्याकडून कारवाईचा बडगा उगारला जातो असे, सरपंच मिलिंद कवळे यांनी गीते यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत सह्याद्रीवर संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही गीते यांनी कोळी समाजाला आश्वासित केले.

अलिबाग रेल्वेने जोडावे अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर अलिबागला रेल्वे आणण्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने अलिबागकरांच्या हितासाठी योग्यतोच निर्णय घेतला. आता नवीन जागा संपादित करणे सोपे राहिलेले नाही. आरसीएफ कंपनीची जुनी रेल्वे लाइन वापरता येईल का याची पडताळणी केली. त्यानंतर आरसीएफ कंपनी प्रशासनाने या संदर्भात होकार दर्शविला होता. आता लवकरच आरसीएफ कंपनी प्रशासन आणि रेल्वे मंत्रालय यांच्यात करार होणार आहे. या जुन्या रेल्वे मार्ग जोडणीला सुमारे २३५ कोटी रु पयांचा खर्च येणार आहे. त्या खर्चाला रेल्वे मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिल्याचेही गीते यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय कवळे, महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, कामगार नेते दीपक रानवडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

वरसोलीतील जमीन होणार होती संपादित
रेल्वे आणण्यासाठी वरसोली येथील जमीन मोठ्या प्रमाणात संपादित होणार होती. त्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना होणार होता. कमीत कमी विस्थापन करून सर्वांचीच जमीन वाचवावी, अशी आग्रही भूमिका सरपंच मिलिंद कवळे यांच्यासह त्यांचे वडील विजय कवळे यांनी घेतली होती.
परंतु २०१४ च्या निवडणुकीनंतर आघाडीची सत्ता गेली आणि युतीची सत्ता आली. त्यामुळे सत्ताधाºयांना जवळ केल्यास यातील प्रश्न मार्गी लागतील याची पक्की खात्री विजय कवळे यांनी होती. त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेचे धनुष्य हातात घेतले. त्यानंतर सूत्र हलली आणि वरसोलीकरांना जे अपेक्षित होते तेच झाल्याची चर्चा आहे.

अद्याप असे कोणतेच नोटीफिकेशन आलेले नाही. रिजनल प्लॅनला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. रेल्वे सुरू झाल्यावरच ती लवकरच होईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. रेल्वे मंत्रालयाला आरसीएफ कंपनीच्या जुनी रेल्वे लाइनचा वापर करता येणार असल्याने त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची बचत होणार आहे. यामध्ये वरसोलीकरांचा फायदाच आहे.
- मिलिंद कवळे, सरपंच,
वरसोली ग्रामपंचायत

Web Title: Flexible line of RCF line for convenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे