डायलिसिस रुग्णांना हवी जीवनदायी योजनेची साथ, कोकणातील रूग्णांवर आर्थिक भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 06:57 AM2018-09-27T06:57:10+5:302018-09-27T06:57:19+5:30

रायगड जिल्हा रुग्णालयात सरकारी डायलिसिस सुविधा आहे. मात्र, तीदेखील अपुरी पडते आहे. त्या व्यतिरिक्त कोकणात सरकारी अथवा ग्रामीण रु ग्णालयात सुसज्ज असे डायलिसिस सेंटर नाही,

 Financial burden on patients in Konkan, along with the need for dialysis patients for life-long planning | डायलिसिस रुग्णांना हवी जीवनदायी योजनेची साथ, कोकणातील रूग्णांवर आर्थिक भार

डायलिसिस रुग्णांना हवी जीवनदायी योजनेची साथ, कोकणातील रूग्णांवर आर्थिक भार

googlenewsNext

- जयंत धुळप
अलिबाग : रायगड जिल्हा रुग्णालयात सरकारी डायलिसिस सुविधा आहे. मात्र, तीदेखील अपुरी पडते आहे. त्या व्यतिरिक्त कोकणात सरकारी अथवा ग्रामीण रु ग्णालयात सुसज्ज असे डायलिसिस सेंटर नाही, त्याउलट काही मोठ्या खासगी रुग्णालयात अधिकृत व सुसज्ज डायलिसिस सेंटर असून, त्यामध्ये केवळ राजीव गांधी (महात्मा फुले) जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ शासनाकडून प्राधिकृत केला नसल्याने रु ग्णांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. दुसरीकडे मुंबई व पुणेसारख्या शहरांत ही योजना अनेक खासगी रुग्णालयांत व चॅरिटेबल ट्रस्टअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या डायलिसिस सेंटरमध्ये कार्यान्वित आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी (महात्मा फुले) जीवनदायी आरोग्य योजनेची कोकणातील ग्रामीण भागातील गरीब व गरजू रु ग्णांना साथ मिळाल्यास त्यांना खºया अर्थाने जीवनदान मिळेल, अशी अपेक्षा डायलिसिल गरजू रुग्णांची आहे.
मधुमेह व उच्च रक्तदाब या आजारानंतर साधारणत: रुग्णांना किडनीचे आजार होतात. कालांतराने किडनी निकामी झाल्याने किडनी प्रत्यारोपण तत्काळ शक्य होत नसल्याने डायलिसिसची गरज लागणाºया रुग्णांची संख्या जास्त आहे. कोकणात सध्या किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रु ग्णांची संख्या वाढत असल्याने, कोकणात खासगी रु ग्णालयात राजीव गांधी (महात्मा फुले) जीवनदायी आरोग्य योजनेसाठी रायगड जिल्ह्यातील महाड, रोहा, खोपोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, सावंतवाडी अशा निवडक तालुक्यात सुसज्ज असलेल्या खासगी रु ग्णालयांत शासनाने जीवनदायी आरोग्य योजनांचा लाभ द्यावा. त्यामुळे तेथील गरीब व गरजू रु ग्णांना आर्थिक दिलासा मिळेल.

महिना ९६०० ते १२००० रुपये खर्च
कोकणात आजपर्यंत कोणत्याही ग्रामीण रु ग्णालयात डायलिसिस सेंटर तर नाहीच, त्याचबरोबर चालू अवस्थेतील डायलिसिस मशीनही नाही. परिणामी, राजीव गांधी (म. फुले) जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ किडनी आजारग्रस्त रु ग्णांना मिळत नाही. केवळ ही योजना डायलिसिस रु ग्णांकरिता नसल्याने एका डायलिसिसला १२०० ते १६०० रु पये खर्च येतो. साधारणत: एका आठवड्यात दोन वेळा डायलिसिस करावे लागत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना दर महिन्याला ९६०० ते १२००० रु पयांपर्यंत खर्च येतो. या व्यतिरिक्त औषधांचा खर्चही असतो. हा खर्च केवळ रा. गां. जी. आरोग्य योजनेमुळे एका डायलिसिसचा खर्च केवळ २४० रुपये अथवा मोफत होऊ शकतो. किडनी निकामी करणाºया या आजारात कोकणातील १८ ते २५ वयोगटातील तरु ण व तरु णींची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोग्य यंत्रणेचा निष्कर्ष आहे.

दोन मशिन्सची गरज
अलिबाग येथील रायगड जिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवेकरिता सद्यस्थितीत पाच मशिन्स २४ तास कार्यरत आहेत. एका रुग्णाच्या डायलिसिसकरिता चार तासांचा कालावधी लागतो. २४ तासांत १८ ते २० रुग्णांना डायलिसिस सेवा देता येते. सद्यस्थितीत २८ रुग्ण प्रतीक्षायादीत आहेत, त्यांना येथे डायलिसिस सेवा देता येत नाही. आणखी दोन मशिन्स प्राप्त झाल्यास प्रतीक्षायादीवरील सर्वांना ही सेवा देणे शक्य होऊ शकेल. जिल्हा सरकारी रुग्णालयात सद्यस्थितीत केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डधारक रुग्णांना मोफत तर पांढरे रेशनकार्डधारकांना २४० रुपयांत डायलिसिस सेवा देण्यात येते.
- डॉ. दीपाली देशमुख, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डायलिसिस युनिट, जिल्हा रुग्णालय, अलिबाग

सिद्धिविनायक न्यासाचे आरोग्य विभागास
७.५ कोटी
रायगड जिल्ह्याकरिताच्या १२ डायलिसिस मशिन्ससह एकूण १०२ डायलिसिस मशिन्स खरेदी करण्याकरिता राज्याच्या आरोग्य विभागाकडे गेल्या चार महिन्यांपूर्वीच सात कोटी ५० लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश आम्ही जमा केला आहे. शासनप्रधिकृत मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून डायलिसिस मशिन्स खरेदी करण्यासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या सर्व मशिन्स खरेदी होऊन नियोजित ठिकाणी डायलिसिस रुग्णांना सेवा देण्यासाठी कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा आहे.
- आदेश बांदेकर, अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक न्यास,
प्रभादेवी, मुंबई.

Web Title:  Financial burden on patients in Konkan, along with the need for dialysis patients for life-long planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.