३५ दिवसांत ११ कोटी ४९ लाखांचा निधी होणार खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:55 AM2018-02-24T00:55:50+5:302018-02-24T00:55:50+5:30

आपल्या मतदार संघात जनसामान्यांच्या विकासासाठी विकास योजना अमलात आणण्याकरिता प्रत्येक आमदारांना दरवर्षी दोन कोटी रुपयांचा निधी येत असतो.

The expenditure will be to fund 11 crore 49 lakhs in 35 days | ३५ दिवसांत ११ कोटी ४९ लाखांचा निधी होणार खर्च

३५ दिवसांत ११ कोटी ४९ लाखांचा निधी होणार खर्च

Next

जयंत धुळप 
अलिबाग : आपल्या मतदार संघात जनसामान्यांच्या विकासासाठी विकास योजना अमलात आणण्याकरिता प्रत्येक आमदारांना दरवर्षी दोन कोटी रुपयांचा निधी येत असतो. सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा आणि चार विधानपरिषद सदस्य, असे एकूण ११ आमदार असून, त्यांना प्राप्त एकूण २६ कोटी २६ लाख रु पये निधीपैकी अद्याप ११ कोटी ४९ लाख ्नॅपयांचा निधी शिल्लक असून, ३१ मार्चपूर्वी म्हणजे पुढील केवळ ३५ दिवसांत हा निधी खर्च करावा लागणार आहे. ३१ मार्चला निधी परत जाऊ नये, याकरिता प्राप्त निधीच्या अधिक खर्चाच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता घेऊन हा निधी वाचविण्याचा प्रयत्न आमदारांच्या माध्यमातून होत आहे.
पनवेलचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांचा एक कोटी ३१ लाख रुपये, असा सर्वाधिक निधी शिल्लक आहे. श्रीवर्धनचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे यांनी त्यांना प्राप्त निधीतून ४६ विकासकामे केली असून, त्यांचा सर्वात कमी म्हणजे ७८ लाख ५० हजार रु पये निधी शिल्लक आहे. संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आर्थिक वर्षातील शिल्लक ३५ दिवसांत निधी खर्च करण्याच्या नियोजनातून जिल्ह्यात विविध विधानसभा मतदार संघात सध्या भूमिपूजन समारंभांची भाऊगर्दी दिसू लागली आहे. विधानपरिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या आमदारकीचा कार्यकाल मे महिन्यानंतर संपणार असल्याने
त्यांना नव्या आर्थिक वर्षात
निधी मिळणार नाही, अशी माहिती नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी दिली.
प्रत्येक आमदारांना दरवर्षी स्थानिक विकास कार्यक्र मासाठी दोन कोटी रु पयांच्या निधी येत असतो. या निधीतील दहा टक्के निधी अनुसूचित जाती व जमातींच्या कल्याणकारी योजनांकरिता वापरणे अपेक्षित
आहे. मात्र, अधिकाधिक निधी बांधकामावर खर्च होत असल्याचे दिसून येत आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्र म २०१७-१८मध्ये जिल्ह्यातील सात विधानसभा सदस्यांना एकूण १६ कोटी ९७ लाख ३१ हजार रुपये निधी उपलब्ध झाला. यापैकी एकूण २३५ विविध विकासकामांकरिता एकूण नऊ कोटी ६८ लाख निधी वितरीत झाला आणि सात कोटी २८ हजार रुपये आमदार निधी शिल्लक राहिलेला आहे. जिल्ह्यातील चार विधानपरिषद सदस्यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्र माकरिता नऊ कोटी २९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. यापैकी एकूण १७६ विविध विकासकामांकरिता सात कोटी सात लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आणि चार कोटी २१ लाख रुपये निधी अद्याप शिल्लक राहिला आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्र म (रु. लाखांत)
आमदाराचे नाव प्राप्त निधी वितरीत निधी शिल्लक निधी मंजूर कामे
प्रशांत ठाकूर (पनवेल) २९८.९९ १६७.४३ १३१.५६ २९
सुरेश लाड (कर्जत) ३०६.८० १९२.४९ ११४.३१ ३७
मनोहर भोईर (उरण) २५७.८९ १६४.२८ ९३.६१ २५
धैर्यशील पाटील (पेण) २०७.२० ७६.१२ १३१.०८ २५
सुभाष पाटील (अलिबाग) २०९.५२ ११९.३८ ९०.१४ ३९
अवधूत तटकरे (श्रीवर्धन) २१६.९१ १३८.४१ ७८.५० ४६
भरत गोगावले (महाड) २००.०० ११०.८८ ८९.१२ ३४
अनिल तटकरे (राय, रत्ना, सिंधू) २२९.८८ १४४.४३ ८५.४५ ३६
सुनील तटकरे (पूर्ण राज्य) २०२.०० ८२.९९ ११९.०९ २६
जयंत पाटील (पूर्ण राज्य) २३०.१८ ८९.९१ १४०.२७ १७
बाळाराम पाटील (कोकण विभाग) २३७.०० १९०.५० ७६.५० ९७
एकूण २६२६.३७ १४७६.८२ ११४९.५५ ४११

Web Title: The expenditure will be to fund 11 crore 49 lakhs in 35 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.