महामार्गावर धुळीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 04:22 AM2018-04-22T04:22:01+5:302018-04-22T04:22:01+5:30

जागोजागी मातीचे ढिगारे रचून ठेवले आहेत. ही धूळ वाहनचालक, दुचाकीस्वार व प्रवाशांच्या नाकातोंडात जाऊन त्याचा त्यांना त्रास होत आहे.

Dust troubles on the highway | महामार्गावर धुळीचा त्रास

महामार्गावर धुळीचा त्रास

googlenewsNext

राबगाव/पाली : पाली- वाकण पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. येथून वाहने जाऊन मोठ्या प्रमाणात धुरळा पसरत आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवासी यांना त्रास होत आहे.
मोठ्या प्रमाणात धुरळा उडत असल्याने समोरून येणारी व जाणारी वाहने दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच धुरळा उडू नये म्हणून माती बसण्यासाठी पाणीदेखील टाकले जात नाही. जागोजागी मातीचे ढिगारे रचून ठेवले आहेत. ही धूळ वाहनचालक, दुचाकीस्वार व प्रवाशांच्या नाकातोंडात जाऊन त्याचा त्यांना त्रास होत आहे. त्यामुळे या महामार्ग रुंदीकरणाच्या कामात सुरक्षितता बाळगली जात नसल्याचा आरोप अनेक जण करत आहेत. यामुळे श्वसनाचाही त्रास होत असून, लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महामार्गाचे सुरू असलेले काम, खड्डे आणि धूळ यामुळे चालक व प्रवाशांसह महामार्गाशेजारील दुकानदार, हॉटेल व्यावसायिक व रहिवासीदेखील हैराण झाले आहेत.

या मार्गावर प्रचंड धुरळा उडत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालक बेजार झाले आहेत. धुरळ्यामुळे अनेकदा समोरील वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघताचा धोका आहे. ठेकेदाराने वेळीच या संदर्भात योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- सचिन जाधव , वाहनचालक

Web Title: Dust troubles on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड