एसटीच्या धडकेने पादचा-याचा मृत्यू, चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 02:39 AM2017-09-07T02:39:43+5:302017-09-07T02:39:45+5:30

भरधाव वेगात जाणा-या एसटीने आवेटी, आदिवासीवाडीत राहणारे महादेव बाळाराम नाईक (३८) यांना धडक दिल्याने ते बसच्या मागच्या टायरखाली आले.

 The death of the pedestrians, the driver has to be taken by the police | एसटीच्या धडकेने पादचा-याचा मृत्यू, चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

एसटीच्या धडकेने पादचा-याचा मृत्यू, चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Next

नागोठणे : भरधाव वेगात जाणा-या एसटीने आवेटी, आदिवासीवाडीत राहणारे महादेव बाळाराम नाईक (३८) यांना धडक दिल्याने ते बसच्या मागच्या टायरखाली आले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास नागोठणे - पोयनाड मार्गावर चोळे गावाचे हद्दीत घडला.
रोहे आगाराचे चालक भरत कोळेकर ( रा. खारी, रोहे, मूळ रा. कोंडगाव घोडा, जिल्हा बीड) हे एमएच १४ बीटी १४१३ या क्र मांकाची नागोठणे - पोयनाड बस घेऊन सकाळी साडेनऊ वाजता नागोठणे बसस्थानकातून मार्गस्थ झाले होते. ही बस १० वाजून ५ मिनिटांनी या मार्गावरील चोळे गावाचे हद्दीत आली असता भरधाव बसने महादेव नाईक या पादचाºयाला जोरदार धडक दिल्याने नाईक जागीच ठार झाले. अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दुपारच्या दरम्यान चालक कोळेकर याला नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले. पो. उपनिरीक्षक दिलीप पालवणकर पुढील तपास करीत आहेत.

Web Title:  The death of the pedestrians, the driver has to be taken by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात