खोपोलीत डॉक्टरची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:29 PM2019-02-22T23:29:39+5:302019-02-22T23:36:54+5:30

खोपोलीतील एका डॉक्टरची स्वस्तात सोने देणार असल्याचे सांगून सहा लाखांची फसवणूक के ली आहे.

Cheating doctor in khopoli by gold | खोपोलीत डॉक्टरची फसवणूक

खोपोलीत डॉक्टरची फसवणूक

Next

खालापूर : खोपोलीतील एका डॉक्टरची स्वस्तात सोने देणार असल्याचे सांगून सहा लाखांची फसवणूक के ली आहे.
डॉक्टर बन्सीलाल लक्ष्मण पाटील (रा. सी विंग वृंदावन कॉम्प्लेक्स रेव्हिनी कॉलनी कचेरी रोड, मुद्रे बुद्रुक कर्जत) यांचे खालची खोपोली (खालापूर) येथे रुग्णालय आहे. दिनेश प्रजापती व त्याचे वडील वेळोवेळी रुग्ण म्हणून डॉक्टर बन्सीलाल यांच्या रुग्णालयामध्ये येऊन उपचार घेत असत. डॉक्टरांसोबत प्रजापती पितापुत्रांनी जवळीक साधली होती. याचा फायदा घेत दिनेश व त्याच्या वडिलांना खोदकाम करताना सोने सापडले असे डॉक्टर बन्सीलाल यांना सांगितले व सोने दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. डॉक्टरांनी त्यामधील काही मणी काढून घेत मणी सोन्याचे आहेत त्याबाबत खात्री केली असताना मणी सोन्याचे असल्याचे दिसून आले.

प्रजापती पितापुत्राने त्यांना पैशाची अडचण असल्याचे सांगून त्यांच्याकडील सोन्याच्या सरी डॉक्टर बन्सीलाल यांच्याकडे गहाण ठेवून त्यांच्याकडून सहा लाख रुपये रोख रक्कम घेतली होती. त्यानंतर प्रजापती पितापुत्र रुग्णालयात येण्याचे बंद झाले. मोबाइल देखील लागत नसल्याने संशय आलेल्या डॉक्टर बन्सीलाल यांनी सोन्याच्या सरी पुन्हा सोनाराकडे तपासल्या असता सोने नकली असल्याचे समजले. दिनेश प्रजापती व त्याच्या वडिलांनी फसवल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टर पाटील याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्र ार दिली आहे.
याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि येडेपाटील हे करीत आहेत.
 

Web Title: Cheating doctor in khopoli by gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.