Agriculture loan is second in Raigad, District Collector, said | कृषी कर्जवाटपात रायगड राज्यात दुसरा, जिल्हाधिका-यांनी दिली माहिती

अलिबाग - खरीप आणि रब्बी या दोन्ही कृषी हंगामाकरिता रायगड जिल्ह्यास २१५ कोटी ७६ लाख रुपयांच्या कृषी कर्जवाटपाच्या उद्दिष्टापैकी ३१ डिसेंबर २०१७ अखेर ७४ टक्के म्हणजे १६० कोटी ७३ लाख रुपयांचे कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. यामुळे रायगड जिल्ह्याने राज्यात कृषी कर्जवाटपाच्या बाबतीत द्वितीय क्रमांक संपादन केला असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी संध्याकाळी आयोजित ‘सिद्धी २०१७ संकल्प २०१८’ पत्रकार संवाद कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, जिल्ह्यास खरीप हंगामात १८९ कोटी २५ लाख कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १४७ कोटी ८४ लाख ६३ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने कृषी कर्जवाटपात १०० टक्के उद्दिष्ट साध्य करून उत्तम कामगिरी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ९० कोटी ३३ लाखांहून अधिक रकमेचे कर्ज वितरण केले. या वेळी शेतकरीहिताच्या योजना व ग्रामविकासाच्या विविध योजनांमधील कामगिरीची माहिती त्यांनी सादरीकरणाद्वारे मांडली. तसेच आगामी काळात जिल्ह्यात कातकरी उत्थान अभियान, आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी कायापालट अभियान, बोट अ‍ॅम्ब्युलन्स सेवा, पर्यटन विकास, तसेच ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान या महत्त्वाच्या उपक्र मांबद्दल माहिती दिली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात ११ हजार ८१५ शेतकºयांना २० कोटी ८८ लाख ३५ हजार ३०९ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. जिल्ह्यात एकूण ९४७ थकबाकीदार शेतकºयांना पाच कोटी ६० लाख २२ हजार ८१६ रु पयांचे कर्ज माफ झाले. तर नियमित कर्ज परतफेड करणाºया १० हजार ८६८ शेतकºयांना १५ कोटी २८ लाख १२ हजार ४९३ प्रोत्साहनपर लाभ देण्यात आल्याचे तसेच डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना हा लाभ दिला जातो. त्यात १३ हजार ३९५ सभासदांना १ कोटी १९ लाख १८ हजार रुपयांच्या व्याज सवलतीचा लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी तसेच प्रशासकीय यंत्रणांचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

१४७३ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रि या यशस्वी
राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ४४६४ सहकारी संस्थांपैकी निवडणूक जाहीर झालेल्या १४७३ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया वर्षभरात यशस्वीरीत्या पार पडल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय जीवन्नोती अभियानात जिल्हा आता २१व्या क्र मांकावर
जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्राने उत्तम कामगिरी केली आहे. जिल्ह्यात २६ हजार ९२२ स्वयंसाहाय्यता बचतगट आहेत. त्यापैकी १० हजार ६५७ बचतगटांना ८६ कोटी ५१ लाख रुपयांचा पतपुरवठा केला आहे. राष्ट्रीय जीवन्नोती अभियानात ५६१ बचतगटांना पाच कोटी ३२ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. यामुळे राष्ट्रीय जीवन्नोती अभियानात जिल्हा ३४व्या क्र मांकावरून आता २१व्या क्र मांकावर आला असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

डिजिटल अर्थव्यवहारास चालना
जिल्ह्यात १४६८ पॉस मशिन्स वितरित करण्यात आल्या आहेत. बँक आॅफ इंडिया मार्फत अलिबाग तालुक्यातील चोंढी, नागाव, वराडी, वाजे ही गावे डिजिटल अर्थव्यवहारांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. तर स्टेट बँकेमार्फत पेण तालुक्यातील वडखळ, शिर्के ही गावे डिजिटल अर्थव्यवहारात स्वयंपूर्ण झाली आहेत.

किल्ले रायगड विकासासाठी कामे आराखड्यानुसार सुरू
आगामी वर्षातील उपक्र मांची माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, किल्ले रायगड विकासासाठी कामे आराखड्यानुसार सुरू होत आहेत. जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत २२ ग्रामपंचायतींतील ५२ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होताना दिसत आहे. येत्या वर्षभरात तेथे चांगले परिणाम समोर येतील. जिल्ह्यातील अत्यवस्थ रु ग्णांना जलद मुंबईला पोहोचविता यावे, यासाठी बोट अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समुद्रकिनारी असणाºया गावांच्या ग्रामपंचायतींच्या लोकप्रतिनिधींना अन्यत्र भेटी घडवून किनाºयावर पर्यटकांसाठी उत्तम सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला चांगली गती या काळात मिळेल.

जिल्ह्यातील मासेमारी सुविधांचा विकास करण्यासाठी मत्स्यविकास विभागाला मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कातकरवाड्यांना रस्त्याने जोडण्यासाठी चार कोटी १९ लाख रु पयांचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. येत्या काळात अधिकाधिक गतीने जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असेल, असेही त्यांनी सांगितले.


Web Title:  Agriculture loan is second in Raigad, District Collector, said
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.