लोणेरेतील पेट्रोकेमिकल संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:54 PM2018-10-17T23:54:08+5:302018-10-17T23:54:22+5:30

माणगाव : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील पेट्रोकेमिकल संस्थेच्या कर्मचाºयांचे आंदोलन ३ आॅक्टोबरपासून सुरू आहे. प्रत्यक्षात कुणीही याची दखल घेतली ...

agitation get aggravated signs of employee | लोणेरेतील पेट्रोकेमिकल संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळण्याची चिन्हे

लोणेरेतील पेट्रोकेमिकल संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळण्याची चिन्हे

Next

माणगाव : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील पेट्रोकेमिकल संस्थेच्या कर्मचाºयांचे आंदोलन ३ आॅक्टोबरपासून सुरू आहे. प्रत्यक्षात कुणीही याची दखल घेतली नाही, त्यामुळे हे आंदोलन आता चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.


रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (बाटु)चा एक भाग असणाºया पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग संस्थेचे प्रत्यक्ष हस्तांतर गेली १४ वर्षे रखडले आहे. त्यामुळे या संस्थेवर नियंत्रण तंत्रशिक्षण संचालनालयाचे की विद्यापीठाचे, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. या विरोधात संस्थेच्या कर्मचाºयांनी ३ आॅक्टोबरपासून आंदोलन सुरू केले आहे. संस्थेतील ४१ शिक्षकेतर कर्मचाºयांनी विद्यापीठाकडून अपेक्षित सेवा मिळत नसल्याच्या कारणावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. ११ मे १९९२ च्या शासननिर्णयानुसार जागतिक बँक प्रकल्पांतर्गत पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूूटचे व्यवस्थापन, मालमत्ता, दायित्व व जबाबदाºयांसह ही संस्था विद्यापीठाकडे वर्ग करण्यात यावी, असा आदेश देण्यात आला. त्यानुसार पेट्रोकेमिकल संस्था २००४ मधील करारानुसार विद्यापीठात विलीन झाली आहे.


मात्र, अद्यापही या संस्थेवर तंत्रशिक्षण संचालकांचे नियंत्रण आहे.


कर्मचाºयांनी ३ ते १२ आॅक्टोबरपर्यंत काळ्या फिती लावून आंदोलन केले. मात्र, कुणीही याची दखल घेतली नाही. उलट विद्यापीठ दबावतंत्र वापरत असल्याचे दिसले. १५ आॅक्टोबरपासून कर्मचाºयांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. कुलगुरू प्रा. विलास गायकर यांनी समन्वयातून हे आंदोलन मिटवावे व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी आता विद्यार्थीच करू लागले आहेत. आंदोलन चिघळल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

कुलसचिवांची परस्पर बदली
च्विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भामरे यांची परस्पर बदली करून ते विद्यापीठातून कार्यामुक्त केले. मात्र, त्यांच्या जागी कुणीही अद्याप नियुक्ती केले नाही, त्यामुळे राज्याचे तंत्रशास्त्र विद्यापीठ भरकटण्याची चिन्हे दिसतात.
काम नाही, पगार नाही
च्कर्मचाºयांनी पुकारलेले लेखणी बंद आंदोलन हे बेकायदा ठरवत, काम नाही तर पगार नाही, असे पत्रकच प्राचार्य डॉ. मधुकर दाभाडे यांनी काढले आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या मनात असंतोष वाढत चालला आहे.

Web Title: agitation get aggravated signs of employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.