मेमो मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:52 AM2018-04-19T03:52:31+5:302018-04-19T03:52:31+5:30

अविनाशकुमार हे मूळचे हिमाचल प्रदेशमधील राहणारे आहेत़

Youth commits suicide after receiving memo | मेमो मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

मेमो मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

Next

पुणे : कोथरुडमधील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाने कंपनीतून मेमो मिळाल्याच्या कारणावरून विष पिऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे़
अविनाशकुमार कृष्णचंद धिमन (वय ३४, रा़ दत्तनगर, शास्त्रीनगर) असे या तरुणाचे नाव आहे़ याबाबत कोथरुड पोलिसांनी सांगितले, की शास्त्रीनगरमधील दत्तनगरमधील एका घरातून वास येत असून आतून घर बंद आहे, अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून दुपारी चार वाजता कोथरुड पोलिसांना कळविण्यात आली़ पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कडी तोडून आत प्रवेश केला असता आत अविनाशकुमार पलंगावर पडलेले होते़
त्यांच्या टेबलावर पिरंगुट येथील एका कंपनीचा मेमो पडलेला होता़ त्यात आठ दिवस कामाला न आल्याने त्यांना हा मेमो दिला होता़ घरात दोन-तीन बाटल्या सापडल्या असून त्यावरून त्याने विष पिऊन आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे़
अविनाशकुमारच्या नातेवाईकांनी सांगितले, की अविनाशकुमार हे मूळचे हिमाचल प्रदेशमधील राहणारे आहेत़ गेल्या १७ ते १८ वर्षांपासून ते पुण्यात असून पिरंगुटमधील एका कंपनीत ते टेक्निशियन म्हणून काम करीत होते़ गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा कोणाशी संपर्क नव्हता़

Web Title: Youth commits suicide after receiving memo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.