पावसाच्या हुलकावणीने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 02:57 AM2018-07-28T02:57:35+5:302018-07-28T02:58:11+5:30

दौंड तालुक्यामध्ये पावसाने हुलकावणी दिली असल्याने खरिपाच्या पेरण्या सध्या लांबणीवर पडल्या आहेत

The worry of farmers increased the worry of farmers | पावसाच्या हुलकावणीने शेतकऱ्यांची चिंता वाढली

पावसाच्या हुलकावणीने शेतकऱ्यांची चिंता वाढली

Next

खोर : पावसाच्या दडीमुळे शेतकरीवर्गाची चिंता वाढली आहे. संपूर्ण राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र दौंड तालुक्यामध्ये पावसाने हुलकावणी दिली असल्याने खरिपाच्या पेरण्या सध्या लांबणीवर पडल्या आहेत. 
जून-जुलैमधील पाऊस तर गेला आहे. पालख्यांचा वारीमधील पाऊसदेखील गेला. आता पुढील श्रावणी पाऊस तरी होईल का? हीच चिंता शेतकºयांना पडली आहे. पावसाच्या दडीमुळे खरिपाचा हंगामदेखील लांबणीवर पडला आहे. ऐन पावसाळ्याच्या कालावधीत खोर (ता. दौंड) परिसरामधील असलेला डोंबेवाडी पाझर तलाव, ओढे, विहिरी, नाले, कोरडेठाण आहेत. खोर परिसरातील जवळपास ८0 टक्के खरिपाच्या पेरण्या रखडलेल्या गेल्या असून, खरिपाचा हंगाम वाया जातो की काय याच संभ्रमामध्ये या भागामधील शेतकरीवर्ग आहे.
ज्या शेतकºयांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत; त्या पेरण्यादेखील संभ्रम अवस्थेत पडल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही अवस्थेत शेतकरी सापडला आहे. पावसाच्या लांबणीमुळे खरीप हंगामाबरोबर पुढील रब्बीचा हंगामदेखील कोलमडला जाऊ शकतो. पावसाअभावी शेतजमिनी पडीक ठेवण्याची वेळ आली आहे.

Web Title: The worry of farmers increased the worry of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.