जागतिक मातृदिन विशेष : नवजात बाळांसाठी जीवनदायी ठरतीये मिल्कबँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 09:45 AM2018-05-13T09:45:40+5:302018-05-13T09:45:40+5:30

मागील दोन वर्षापासून ससूनमध्ये राबविण्यात येणा-या  मातृदुध संकलन पथक अर्थात मिल्क बँकेच्या  माध्यमातून 1437 लीटर दुधाचे संकलन करण्यात आले आहे. या प्रकारच्या अभिनव उपक्रमामुळे गरजु लहान बाळांच्या दुधाची अडचण दूर होत असून याकरिता शहरातील वेगवेगळ्या भागातील महिला स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत.  

World Mother's Day special: Milkbank life giving option for newborn babi | जागतिक मातृदिन विशेष : नवजात बाळांसाठी जीवनदायी ठरतीये मिल्कबँक

जागतिक मातृदिन विशेष : नवजात बाळांसाठी जीवनदायी ठरतीये मिल्कबँक

Next

पुणे :  आईचे दुध हाच नवजात बाळांकरिता सर्वोत्तम पोषण आहार. मात्र सध्या बाळाच्या जन्मानंतर मातेच्या शरीरात दुधाची वाढ कमी होणे यामुळे बाळाला जन्मल्यानंतर सर्वाधिक गरजेचे असलेले दुध मिळत नाही. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होताना दिसून येतो. मात्र मागील दोन वर्षापासून ससूनमध्ये राबविण्यात येणा-या  मातृदुध संकलन पथक अर्थात मिल्क बँकेच्या  माध्यमातून 1437 लीटर दुधाचे संकलन करण्यात आले आहे. या प्रकारच्या अभिनव उपक्रमामुळे गरजु लहान बाळांच्या दुधाची अडचण दूर होत असून याकरिता शहरातील वेगवेगळ्या भागातील महिला स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत.  आत्तापर्यंत ६हजार ४३२ बाळांना या मातृदुधाचा लाभ मिळाला आहे. याकरिता ससून प्रशासनाच्यावतीने टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे.

   शहरातील विविध सोसायटी यामधून उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दुध संकलन उपक्रमात सहभागी होण्यासाठी रुग्णालय प्रशासनाच्यावतीने काळजी घेतली जाते. ज्या महिलांचे दुध संकलन केले जाते त्यांच्या आरोग्याची तपासणी करुनच दुध घेतले जाते. नवजात बालकांना, ज्या मातांना दुधाची कमतरता आहे अशा मातांच्या दुधाची कमतरता भरु न काढण्यासाठी आणि अनाथ मुलांना हे दुध मोठा आधार आहे अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.  

     सध्या ससूनमध्ये रोज 3 ते 4 लीटर दुध संकलित केले जाते. त्यानंतर ते दुधावर प्रक्रिया केली जाते. पाश्चराईज्जड केलेल्या दुधाचे सँम्पल प्रयोगशाळेत पाठवले जाते. प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालानुसार ते दुध गरजेनुसार नवजात बालकांना दिले जाते. हे दुध जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यत टिकते. त्यासाठी ते डीप फ्रीजरमध्ये ठेवले जाते. ससूनमध्ये 59 एनआयसीयु बेड असून त्यातील नवजात बालकांना संकलित केलेले दुध दिले जाते. याबरोबरच ससूनच्या आवारात असलेले सोफोश अनाथालयातील बाळांकरिता देखील हे दुध महत्वाचे ठरते. त्यांना साधारण 200 ते 500 मिली दुध दिले जाते. 

    याविषयी अधिक माहिती देताना बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील बालरोग चिकित्साशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ.आरती किणीकर म्हणाल्या की, मिल्क बँक या उपक्रमाला 4 तर नुकत्याच नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या मिल्क बँकेला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. एनआयसीयुच्या बाळांना हे दुध दिले जाते. या उपक्रमात आम्हाला अनेकांचे सहकार्य लाभते. यात इंटर्नशिप करणारे डॉक्टर विद्यार्थी, नर्सेस, यांचा सहभाग आहे. आपल्याकडे अद्याप दुधसंकलन आणि ते दुध बाळाला देणे याविषयी महिलांच्या मनात भीती दिसून येते. ती कमी करण्यासाठी महिलांना समुपदेशनाचे काम केले जाते. अनेक महिलांना त्यांच्याकडे दुधाचे प्रमाण पुरेसे असताना देखील केवळ भीतीपोटी त्या दुध डोनेट करण्यास टाळाटाळ करतात. काहींच्या मनात या नवीन संकल्पनेबद्द्ल शंका पाहवयास मिळते. अशावेळी त्यांना उपक्रमाची योग्य माहिती देवून दुध संकलनास प्रोत्साहन देणे महत्वाचे ठरते. 

Web Title: World Mother's Day special: Milkbank life giving option for newborn babi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.