Pune: चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून महिलेची १२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

By भाग्यश्री गिलडा | Published: January 22, 2024 04:26 PM2024-01-22T16:26:19+5:302024-01-22T16:26:49+5:30

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २१) गुन्हा दाखल केला आहे...

Woman defrauded of Rs 12 lakh by lure of good returns, case registered | Pune: चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून महिलेची १२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

Pune: चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून महिलेची १२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

पुणे : टेलिग्रामवर ओळख करून पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २१) गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, लोहगाव परिसरात राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोळखी मोबाइल क्रमांकावरून २४ ऑक्टोबर २०२३ रोजी मेसेज आला. अनामिका बोलत असल्याचे भासवून पार्ट टाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे चांगले पैसे कमावता येतील, असे त्यात म्हटले हाेते.

त्यानंतर टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केले. वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळेल असे सांगितले. सुरुवातीला मोबदला देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर गुंतवणुकीचे आमिष दाखवून प्रीपेड टास्कच्या नावाखाली एकूण १२ लाख २० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही परतावा न मिळाल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक ढवळे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Woman defrauded of Rs 12 lakh by lure of good returns, case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.