Pune By-Election: कसब्यात शिवसेनेचा उमेदवार जाहीर होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 03:19 PM2023-01-30T15:19:17+5:302023-01-30T15:19:26+5:30

शिवसैनिकांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

Will the Shiv Sena candidate be announced in the town | Pune By-Election: कसब्यात शिवसेनेचा उमेदवार जाहीर होणार?

Pune By-Election: कसब्यात शिवसेनेचा उमेदवार जाहीर होणार?

googlenewsNext

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचा उमेदवार उतरविणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी इच्छा पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक येत्या दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे अनेक इच्छुकांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश आणि चिंरजीव कुणाल यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेता गणेश बीडकर आणि धीरज घाटे या पाच जणांची नावे प्रदेश कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. त्यात आता कसबा विधानसभा पोट निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कसबा पोटनिवडणूक लढवण्याची मागणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पोट निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची काल पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीत पुणे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी इच्छा पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे.

शिवसैनिकांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, बैठकीनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टर वायरल केले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडुन या उमेदवारी बाबत काय निर्णय होतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Will the Shiv Sena candidate be announced in the town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.