प्रशासकीय सेवेतून राज्याला पुढे घेऊन जाण्याचा एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 07:35 PM2018-05-31T19:35:49+5:302018-05-31T19:35:49+5:30

महाराष्ट्र लाेकसेवा अायाेगाच्या परीक्षांचा निकाल बुधवारी रात्री उशीरा जाहीर झाला. या परीक्षेत अनेकांनी घवघवीत यश संपादन केले अाहे.

will take state ahed, says mpsc pass students | प्रशासकीय सेवेतून राज्याला पुढे घेऊन जाण्याचा एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निर्धार

प्रशासकीय सेवेतून राज्याला पुढे घेऊन जाण्याचा एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निर्धार

googlenewsNext

पुणे :  महाराष्ट्र लाेकसेवा अायाेगाच्या (एमपीएससी) विविध परीक्षांचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात अाला. या परीक्षेत राज्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी एकत्र येत अापले यश साजरे केले. अायुष्यातील माेठा टप्पा पार करुन प्रशासकीय सेवेत रुजु झाल्याचा अानंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत हाेता. प्रशासकीय सेवेत राहून राज्याला पुढे घेऊन जाण्याचा निर्धार या विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला. 


    गडचिराेली या नक्षली भागात 12वी पर्यंत शिक्षण घेऊन पुण्यात अालेला अाणि स्पर्धा परीक्षेची तयारी करुन उपजिल्हाधिकारी म्हणून रुजु हाेणारा पियुष चिवंडे म्हणाला, सुरुवातीला अनेकदा अपयश अाले परंतु खचून गेलाे नाही. टिकून राहण्याचं बळ शिक्षकांकडून मिळालं. माझ्या यशात अाई-वडिलांचाही माेठा वाटा अाहे. 2012 मध्ये ग्रॅज्युएेशन केल्यानंतर मी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातील युपीएससीची तयारी करत हाेताे. परंतु त्यात अपयश अाल्यानंतर पुर्णवेळ एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात पाचवा अालेला मालेगावचा दत्तु शेवाळेला अभ्यासात सातत्य ठेवल्यास, कठाेर परिश्रम घेतल्यास अाणि संयम ठेवल्यास यश नक्कीच मिळतं असं वाटतं. दत्तु अाता उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू हाेणार अाहे. ताे 2015 पासून या परीक्षेची तयारी करत हाेता.


    उस्मानाबादच्या परांडा मधील रेणुका काेकाटे तहसीलदार म्हणून प्रशासकीय सेवेत रुजू हाेणार अाहे. तिने केलेल्या तयारीबाबत बाेलताना ती म्हणाली, दिवसातील सात ते अाठ तास मी अभ्यास केला. 2015 पासून या परीक्षेची तयारी करीत हाेते. सुरुवातीला अपयश अालं परंतु अापण प्रयत्न करत रहायचे हे मनाशी पक्के ठरवले हाेते. माझे वडील शेती करतात तर अाई गृहीणी अाहे. मला चार बहिणी अाहेत. याअाधी 2017 मध्ये मी पीएसअाय, एसटीअाय या परीक्षा उत्तीर्ण झाले अाहे. बीएससी केल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास सुरुवात केली. अापण केलेल्या मेहनत अाज फळाला अाली याचा खूप अानंद हाेताेय. अहमदनगरची प्रतिक्षा बुते ही 2014 पासून या परीक्षांची तयारी करत हाेती. अाता ही परीक्षा पास झाल्यानंतर ती सुद्धा तहसीलदार म्हणून काम करणार अाहे. प्रतिक्षाने विठ्ठलराव विखे महाविद्यालयातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं अाहे. त्यानंतर ती या परीक्षांच्या तयारीकडे वळाली. प्रतिक्षाचा हा पहिलाच प्रयत्न हाेता अाणि त्यात तिला घवघवीत यश मिळाले अाहे.

Web Title: will take state ahed, says mpsc pass students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.