अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पुण्यात स्वागत; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर भाजप मिशन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 11:30 AM2022-09-22T11:30:56+5:302022-09-22T11:31:04+5:30

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा पुण्यात ३ दिवस दौरा

Welcome to Finance Minister Nirmala Sitharaman in Pune BJP mission starts on NCP's stronghold | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पुण्यात स्वागत; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर भाजप मिशन सुरु

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पुण्यात स्वागत; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर भाजप मिशन सुरु

Next

धनकवडी : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बुधवारी (दि.२१) सायंकाळी धनकवडीत आगमन झाले. सायंकाळी आठ वाजता त्या आमदार भिमराव तापकीर यांच्या धनकवडीतील मातोश्री बंगल्यावर पोहचल्या यावेळी आमदार तापकीर परिवाराने त्यांचे आदरातिथ्य केले. सुरुवातीला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर तापकीर कुटुंबातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी फुलांची आकर्षक सजावट आणि नेत्रदीपक रांगोळी काढण्यात आली होती. 

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. भाजपच्या मिशन बारामतीची सुरुवात बुधवारी झाली असून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. सीतारमण यांचा या ठिकाणी तीन दिवस दौरा असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामती लोकसभा मतदारसंघातील आजच्या पहिल्याच दिवशी आपल्या पक्षाच्या घरीच वास्तव करण्याचा निर्णय घेत कार्यकर्त्यांना सुखद धक्का दिला. 

Web Title: Welcome to Finance Minister Nirmala Sitharaman in Pune BJP mission starts on NCP's stronghold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.