we should give credit to congress for maintainig democracy, says nana patekar | लाेकशाही अजून टिकून अाहे, याचं श्रेय काॅंग्रेसला द्यायला हवं: नाना पाटेकर
लाेकशाही अजून टिकून अाहे, याचं श्रेय काॅंग्रेसला द्यायला हवं: नाना पाटेकर

पुणे : इतक्या वर्षांमध्ये कॉग्रेसने काहीच केलं नाही असं म्हणता येणार नाही. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर लोकशाही अजूनही टिकून आहे, याचं श्रेय काँग्रेस ला द्यायला हवं असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. 
    नाम फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
      काँग्रेस -राष्ट्रवादी सत्तेत आले तर शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल का या प्रश्नला उत्तर देताना नाना म्हणाले, हमीभाव हे निवडणुकीचे आश्वासन नसून तो शेतकऱ्यांचा हक्क आहे. तो त्यांना मिळायला हवा. शेतकाऱ्यांची दीडपट हमीभावाची मागणी रास्त आहे. सातवा वेतन अायाेग जसा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळायला हवा त्याप्रमाणेच शेतकऱ्यांनाही त्यांच्या पिकाला हमीभाव मिळणे अावश्यक अाहे. सध्या सगळीकडे बेराेजगारी वाढत अाहे. पुढच्या काळातही नाेकऱ्या वाढतील याची शक्यता कमी अाहे. शेती हा पुढच्या काळात राेजगार देणारा व्यवसाय असेल. सलमानच्या शिक्षेबद्दल नाना म्हणाले, न्याय व्यवस्थेसमाेर सर्व समान अाहेत त्यामुळे त्याबद्दल काही वक्तव्य करणं याेग्य हाेणार नाही. शरद पवार पंतप्रधान व्हावेत असे वाटते का या प्रश्नावर उत्तर देताना आपल्याला अनेक वर्षांपासून शरद पवार पंतप्रधान व्हावे असं वाटतंय, त्यांच्यानंतरही अनेक नेते पंतप्रधान झाले. पवार हे पंतप्रधान हाेता हाेता राहिले अाहेत असे म्हणत नानांनी पवारांच्या पंतप्रधान पदाच्या चर्चेबाबत भाष्य केले. 
    विविध पुरस्कारांबाबत ते म्हणाले, पुरस्कार हा का दिला जाताेय, ताे त्याच व्यक्तीला का दिला जाताेय हे सांगितले पाहिजे. मला पद्मश्री का दिला हे मला माहित नाही. अाम्ही व्यावसायिक लाेक अाहाेत. अाम्ही अामच्या कामाचे पैसे घेताे. अांबेडकर, कर्वे या महापुरुषांनी राष्ट्रासाठी अापलं अायुष्य खर्च केलं हाेतं. अश्या लाेकांना पुरस्कार मिळणं याेग्य अाहे. मी अभिनयाच्या माध्यमातून फक्त मनाेरंजन केलंय. मात्र नामच्या माध्यमातून समाजउपयाेगी काम करायला मिळणं हा माझा खूप माेठा सन्मान अाहे असं मला वाटतं.


Web Title: we should give credit to congress for maintainig democracy, says nana patekar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.