we have attachment to this place do not demolish it | या जागेशी अामचे ऋणानुबंध ; बालगंधर्व पाडू नका
या जागेशी अामचे ऋणानुबंध ; बालगंधर्व पाडू नका

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून अाम्ही इथे काम करताेय. या नाट्यगृहाप्रमाणे दुसरे कुठलेच नाट्यगृह पुण्यात काय महाराष्ट्रात कुठेच नाही. या नाट्यगृहाला माेठा इतिहास अाहे. त्यामुळे बालगंधर्व नाट्यगृह पाडू नये अशी मागणी बालगंधर्व नाट्यगृहात गेली 30 -35 वर्षांपासून बॅकस्टेजचे काम करणाऱ्या कलाकारांनी केली अाहे. 


    पुण्याचे सांस्कृतिक केंद्र असलेले बालगंधर्व नाट्यमंदिर पाडून त्या ठिकाणी सुसज्ज असे नवीन नाट्यगृह बांधण्याचा तसेच नाट्यगृहाच्या अाजूबाजूचा परिसरात विविध विकासकामे करण्याचा पालिकेचा प्रस्ताव अाहे. त्यासाठी 10 लाखांची तरतूद देखिल 2018 -19 च्या अर्थसंकल्पात करण्यात अाली अाहे. परंतु नाट्यगृहाच्या सध्याच्या वास्तूला माेठा इतिहास असल्याने ही वास्तू न पाडता इतर हवी ती विकासकामे करावीत अशी मागणी येथे काम करणारे बॅकस्टेज कलाकार करत अाहेत. 1962 साली बालगंधर्व नाट्यमंदिराचे भूमिपूजन करण्यात अाले हाेते. अाणि 1968 साली त्याचे उद्घाटन करण्यात अाले. तेव्हापासून अात्तापर्यंत नाट्यसृष्टी असाे की सिनेमासृष्टी यातील अनेक कलाकारांनी या ठिकाणी काळ गाजवला अाहे. पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नाट्यगृह बांधण्यात अाले हाेते. या नाट्यगृहाचे उद्घाटन तत्कालिन गृहमंत्री अाणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात अाले हाेते. 


    नाट्यगृह बांधून पाडण्याबाबत बॅकस्टेज कलाकार रवी पाटील म्हणाले, बालगंधर्व पाडायला नकाे, असे नाट्यगृह महापालिकेला पुन्हा बांधता येणार नाही. या नाट्यगृहाप्रमाणे इतर ठिकाणी नाट्यगृह बांधण्याचा प्रयत्न पालिकेकडून करण्यात अाला परंतु त्यांना याप्रमाणे नाट्यगृह पालिकेला बांधता अाले नाही. याठिकाणी बॅकस्टेज अार्टिस्टसाठी ज्या साेयी अाहेत त्या इतर कुठल्याही नाट्यगृहात नाही. मी भारतातील अनेक नाट्यगृह पाहिली पण बालगंधर्व प्रमाणे दुसरे नाट्यगृह दिसले नाही. बॅकस्टेजच्या दृष्टिकाेनातून हे नाट्यगृह परिपूर्ण अाहे. माझ्या अायुष्यातला माेठा काळ मी बालगंधर्वमध्ये घालवला अाहे. मला माझ्या घरापेक्षा बालगंधर्व अधिक प्रिय अाहे.

 


   प्रदीप जाधव म्हणाले, ही वास्तू ताेडण्यात येऊ नये. या वास्तूमागे अनेकांच्या अाठवणी दडल्या अाहेत. बॅकस्टेजला जितकी सुविधा अाहे तितकी सुविधा इतर कुठेही नाही. सकाळी 8 पासून संध्याकाळपर्यंत अाम्ही इथेच असताे. अामची इच्छा अाहे की हे नाट्यगृह असेच रहावे इतर काही विकासकामे करायची असल्यास नाट्यगृहाच्या इमारतीला हात न लावता ती करावीत. 


    माेहन अापटे म्हणाले, इतर विकासकामे करायला हरकत नाही, परंतु मूळ नाट्यगृह पाडता कामे नये. इथल्या सारखी साेय दुसरीकडे नाही. या नाट्यगृहात कला सादर करण्याचं जे सुख कलाकारांना मिळतं ते इतर कुठेही मिळत नाही. 


Web Title: we have attachment to this place do not demolish it
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.