सोलापूरची तहान भागणार,  उजनी धरणातून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 09:24 PM2018-03-25T21:24:14+5:302018-03-25T21:24:14+5:30

टाकळी बंधाऱ्यात काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी व पंढरपूरच्या वारीसाठी पाणी सोडण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर ऐन उन्हाळ्यात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे.

water released from ujine dam | सोलापूरची तहान भागणार,  उजनी धरणातून विसर्ग सुरू

सोलापूरची तहान भागणार,  उजनी धरणातून विसर्ग सुरू

Next
ठळक मुद्देइंदापूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांना मिळणार ५ टीएमसी पाणी  उजनी धरणाच्या १२ दरवाजांतून शनिवारपासून विसर्ग सुरू 

इंदापूर : उजनी धरणातून शनिवारपासून  सोलापूरसह नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी धरणाच्या १२ दरवाजांतून १५ हजार क्युसेक्स क्षमतेने भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. धरणात सध्या ६१.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून जवळपास ५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याचे उजनी धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले. सुरुवातीला  रात्री ९ वाजता अडीच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. उजनी धरणालगतच्या बाभुळगाव, गलांडवाडी नं. २, भाटनिमगाव, अवसरी, सुरवड, बेडशिंगे, भांडगाव, वडापुरी या इंदापूर तालुक्यातील, तर सोलापूर जिल्ह्यातील रांझणी, रुई, आलेगाव या सोलापूर जिल्ह्यातील गावांमधील शेतकºयांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. 

     सोलापूरला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा सध्या कोरडा पडला होता. टाकळी बंधाऱ्यात काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी व पंढरपूरच्या वारीसाठी पाणी सोडण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर ऐन उन्हाळ्यात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. सोलापूरच्या औज बंधाºयात पाणी पोहोचण्यास अजून किमान दहा ते बारा दिवस लागणार आहेत. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: water released from ujine dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.