पुण्याचा पाणीसाठा तळाला, पावसाळा लांबल्यास भीषण परिस्थिती उद्भवणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:05 PM2018-05-08T15:05:19+5:302018-05-08T15:06:36+5:30

शहराची वाढती लोकसंख्या आणि ग्रामीण भागात पाणी वहनाची जुनी पद्धती यामुळे पुण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यंदा उन्हाळ्याच्या मध्यावर जेमतेम पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबला तर भीषण परिस्थिती उद्भवू शकते. 

water level falling day by day at khadkwasla and other dams | पुण्याचा पाणीसाठा तळाला, पावसाळा लांबल्यास भीषण परिस्थिती उद्भवणार 

पुण्याचा पाणीसाठा तळाला, पावसाळा लांबल्यास भीषण परिस्थिती उद्भवणार 

Next
ठळक मुद्देपुण्याचा पाणीसाठा घटला, पानशेत आणि खडकवासला धरणांचा आधार  टेमघरमध्ये  शून्य तर वरसगावमध्ये अवघे एक टक्के पाणी 

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांचा पाणीसाठा वेगाने खालावत आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत पाणीसाठा जपून वापरण्याची वेळ पुणेकरांवर येणार आहे. वाढते तापमान आणि त्यामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून त्याचा परिणाम पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. उन्हाळ्याच्या मध्यावर जेमतेम पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबला तर भीषण परिस्थिती उद्भवू शकते. 

 

    महिन्याला सुमारे सव्वा ते दीड टीएमसीच्या दरम्यान पाणी पुणे शहराकडून खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर धरणातून वापरले जाते. या खडकवासला धरण साखळी नावाने ओळखल्या जाणाऱ्या धरणातून पुणे शहराला पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जातो.  यातील  टेमघरची क्षमता  ३.७१ टीएमसी, पानशेतची क्षमता १०.६५ टीएमसी, वरसगावची क्षमता  १२.८२ टीएमसी,खडकवासला धरणाची क्षमता १. ९७ टीएमसी आहे. सध्या या धरणांमध्ये पाणी कमी होत असून खडकवासला वगळता बाकी धरणांनी तळ गाठला आहे. टेमघर धरणात एकूण क्षमतेच्या शून्य टक्के पाणी आहे. या धरणाची दुरुस्ती करण्याच्या कारणामुळे या धरणातील पाणी लवकर संपवण्यात आले आहे. पानशेत धरणात एकूण क्षमतेच्या ६० टक्के पाणी शिल्लक आहे. तर वरसगाव धरणात अवघे १ टक्के पाणी शिल्लक असून सर्वात लहान खडकवासलाधरणात ९० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

 

याशिवाय सध्या उन्हाळी आवर्तन सुरु आहे. साधारण १५ जुलैपर्यँत पाण्याचे नियोजनकरण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतो. यंदा पाणीसाठा असला तरी ग्रामीण भाग आणि शहर यांचे वाटप बघता जेमतेम काठावर पुरेल एवढे पाणी शिल्लक आहे. पावसाळा लांबल्यास जिल्ह्यासह ४० लाख पुणेकरांना तहानलेले राहावे लागू शकते. वाढती उष्णता आणि पाणी वाहत असताना होणारे बाष्पीभवन आणि जिरण्याची प्रक्रिया यामुळे पाणी कमी होते. जिल्ह्यात कालव्यावाटे पाणी पोचवत असल्याने बरेचसे पाणी जिरून जाते. दुसरीकडे पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराच्या पाण्याने वापराची मर्यादा ओलांडली आहे. या सर्व बाबींचा विचार करून पाण्याचे नियोजन झाले नाही तर पुढच्या काही वर्षात भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. 
 

 

 

 

Web Title: water level falling day by day at khadkwasla and other dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.