केतकेश्वर यात्रा वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:38 PM2019-03-31T23:38:34+5:302019-03-31T23:38:49+5:30

देवस्थानऐवजी यात्रोत्सव ट्रस्ट : परंपरा मोडीत निघण्याची भीती

In the vicinity of Ketkeshwar Yatra | केतकेश्वर यात्रा वादाच्या भोवऱ्यात

केतकेश्वर यात्रा वादाच्या भोवऱ्यात

Next

निमगाव केतकी : अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपलेला येथील पारंपरिक श्री केतकेश्वर महादेव महाराज यात्रोत्सव ट्रस्ट निर्मिती मतभेदाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पारंपरिक यात्रा उत्सवाची परंपरा कायम राहणार की भविष्यात मोडीत निघणार याची केतकेश्वर महाराजांच्या भाविकांना काळजी लागली आहे. मात्र, शासनाने प्रत्येक देवस्थानचे ट्रस्ट करण्याच्या निर्णयामुळे ही परंपरा मोडीत निघण्याची भीती व्यक्त होत आहे.

यात्रोत्सव साजरा करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी आवश्यक आहे. त्या शिवाय उत्सव साजरा करण्यास पोलीस यंत्रणेकडून परवानगी मिळत नाही. तसेच या उत्सवाच्या जमा- खर्चास मान्यता देणे या बाबीसाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे देवस्थानची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करुन ट्रस्ट स्थापन करण्यासाठी गावात ग्रामस्थांनी प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रस्टची घटना, संचालक, सभासद निश्चित करताना आपापसातील हेवेदावे व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी केलेल्या पूर्वीच्या चुकांमुळे सर्वसामान्य नागरिक व तरुण युवकांचे मनात यात्रोत्सवाची पारंपरिकता आणि भविष्याबाबत मनात शंका व काळजी आहे. त्यामुळे या वर्गातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर जुनी मंडळी आपलाच हेका कायम ठेवत आहे. तर काही कार्यकर्त्यांनी ट्रस्ट झाल्याशिवाय कुस्त्या व छबिना आणि करमणुकीचे कार्यक्रम घ्यायचे नाहीत, असा स्पष्ट विरोध दर्शवला आहे.
यामुळे निमगाव केतकीची शान आणि परंपरा असणारा केतकेश्वर यात्रा उत्सव संकटाच्या भोवºयात सापडला आहे.
गावातील राजकारणात अनेक गटतट आहेत. पण ते गटतट विसरून सर्व जातीधर्माचे लोक व राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते या उत्सवात सहभागी होतात. गावाच्या ऐक्याचा यात्रा उत्सव पार पाडतात. यात्रा उत्सवासाठी फक्त उत्सव कमिटी असते. त्याचा कोणीही प्रमुख नसतो. सर्वांना समान अधिकार व मानपान असतो.
सर्व ग्रामस्थ या उत्सवासाठी शक्य असणारा वेळ देऊन प्रत्येकाचे घरी जाऊन देणगी गोळा करतात. यात्रा झाल्यावर दुसºया दिवशी मंदिरासमोर बसून हिशेब करुन त्याची सर्वांना माहिती दिली जाते. काही कोणाच्या तक्रारी, सूचना ऐकून निर्णय घेतले जातात. याला १२५ वर्षांपेक्षा जास्त जुनी परंपरा आहे.
मात्र, शासनाने प्रत्येक देवस्थानचे ट्रस्ट करण्याच्या निर्णयामुळे ही परंपरा मोडीत निघू पाहत आहे. या निर्णयामुळे ट्रस्ट स्थापन करणे, त्याचे सभासद, संचालक आणि अध्यक्ष तसेच निवडणूक प्रक्रिया यामुळे यात्रा उत्सवात राजकारण करणाºयाला आयतेच कोलीत मिळाले आहे.
गावात केतकेश्वर महादेव मंदिर देवस्थानचे ट्रस्ट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गावातील नागरिकांमध्ये गेल्या दहा दिवसांत
गट-तट निर्माण होऊन कोणास ट्रस्टचे संचालक करायचे, कोणाची नावे देणार, यात्रा कमिटीत वर्गणीदार कोण, जुने कोण, नवे कोण, परंपरेने यात्रेतील मान कोणाचे, असे अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याची उत्तरे शोधताना पारंपरिक यात्रा उत्सवाची परंपरा कायम राहणार की भविष्यात मोडीत निघणार याची काळजी सर्वसामान्य केतकेश्वर महाराजांच्या भाविकांना आहे.

आखाड्याअभावी कुस्तीशौकीन नाराज...
४निमगाव केतकी हे गाव कुस्तीशौकीन आहे. केतकेश्वर महाराज यात्रेच्या चिंचेच्या आखाड्यात देशातील नामवंत मल्ल हजेरी लावतात. अनेक महाराष्ट्र केसरी, हिंद केसरींनी या आखाड्यात कुस्त्या केल्या आहेत. मात्र यात्रा झाली नाही तर कुस्त्याही होणार नाहीत. त्यामुळे गावात कुस्तीसाठी नव्या पिढीला प्रेरणाही मिळणार नाही, अशी भीती कुस्ती शौकिनांमध्ये आहे.

Web Title: In the vicinity of Ketkeshwar Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे