‘अ’ दर्जाच्या पुणे रेल्वे स्टेशनवर वाहन पार्किंगचा उडालाय बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 03:31 AM2018-12-10T03:31:07+5:302018-12-10T03:31:27+5:30

अपुऱ्या व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; अत्याधुनिक सुविधांची गरज

Vehicle parking will be suspended at 'A' Pune railway station | ‘अ’ दर्जाच्या पुणे रेल्वे स्टेशनवर वाहन पार्किंगचा उडालाय बोजवारा

‘अ’ दर्जाच्या पुणे रेल्वे स्टेशनवर वाहन पार्किंगचा उडालाय बोजवारा

Next

पुणे : पुण्याहून मुंबई, दौंड किंवा इतर ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने रेल्वेने दररोज प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, अपुºया पार्किंग व्यवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाकडे पार्किंगसाठी जागेचा तुटवडा नाही. केवळ योग्य व्यवस्थापनाचा अभाव असल्याने रेल्वे पार्किंगचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे अत्याधुनिक पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून प्रवाशांच्या पार्किंगचा प्रश्न रेल्वे प्रशासनाने सोडवावा, अशी मागणी केली जात आहे.

पुणे रेल्वे स्टेशन वर्ल्ड क्लास दर्जाचे करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस असून सध्या रेल्वे स्टेशन ‘ए’ दर्जाचे आहे. रेल्वे जंक्शन असल्यामुळे देशाच्या विविध भागातील रेल्वे गाड्या पुणे स्टेशनवर येवून थांबतात. त्यातच दिवसेंदिवस पुणे रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणाºया प्रवाशांची संख्याही लक्षणिय आहे. त्यातच विद्येचे माहेरघर सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात शिक्षणासाठी आणि पर्यटनासाठीही अनेक भागातून नागरिक येतात. तसेच राहण्याबाबत सर्वाधिक चांगले शहर म्हणूनही पुणे अव्वल क्रमांकावर आहे, या सर्व बाबींचा विचार करता रेल्वे स्टेशनवरही अत्याधुनिक सुविधा असणे आवश्यक आहे. प्रगती एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन आदी गाड्यांनी पुणे रेल्वे स्टेशनवरून मुंबई, सातारा, बारामती आदी ठिकाणी नोकरीसाठी जाणारे प्रवासी तसेच लोणावळा लोकलने पुणे ते लोणावळा दरम्यान खासगी व सरकारी कार्यालयात काम करणारे कर्मचारी यांना दुचाकी व चारचाकी वाहन पार्क करण्यासाठी सहजासहजी जागा मिळत नाही. महात्मा गांधी पुतळ्याजवळील पार्किंगची जागा अपुरी आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहन लावण्यात अडचणी येतात. तसेच पार्किंगमध्ये लावलेली गाडी काढण्यासाठी २० ते ३० मिनिटे जातात. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशनच्या जागेत परिसरातील हॉटेलचालक किंवा इतर व्यक्ती दिवसभर गाड्या लावून निघून जातात. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाºया नियमित पासधारकांसह कधीतरी प्रवास करणाºया प्रवाशांनासुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शिवाजीनगर रेल्वे स्टेशनची जागाही अपुरी
शिवाजीनगर बस थांब्यावरील वाहनतळावरच शिवाजीनगर रेल्वे स्टेशनहून प्रवास करणारे प्रवासी आपल्या दुचाकी लावतात. एसटीने आणि रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी यांना येथील पार्किंग अपुरे पडते. त्यातच येथून मेट्रो जाणार असल्याने प्रवाशांना पार्किंगला जागाच उरली नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुख्य इमारतीसमोरील पार्किंग बरोबरच, डीआरएम कार्यालयाच्या जवळ दुसºया प्रवेशद्वाराजवळ वर्षभरापूर्वी पार्किंगची व्यवस्था केली असून त्यास सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे रेल्वे स्टेशन बसस्थानक आणि रेल्वे रुग्णालयाच्यामध्ये पार्किंगसाठी जागा केलेली आहे. सध्या तरी अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था किंवा केवळ पार्किंगसाठी इमारत बांधण्याचा कोणाही प्रस्ताव नाही.
- मनोज झंवर, जनसंपर्क
अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

पार्किंग व्यवस्थेची माहिती करून द्यावी
रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन समोरील जागेतील पार्किंग आता कमी पडू लागले आहे. याचा विचार करूनच रेल्वे प्रशासनाने बसस्थानक व रेल्वे रुग्णालयाच्या मध्यभागी, पोर्टर चाळ पाडून त्या जागेवर तसेच सहा नंबर प्लॅट फॉर्मच्या बाजूला वाहनतळ आहे. परंतु, याबाबत प्रवाशांना माहितीच नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने फलक लावून किंवा डिजिटल बोर्डवरून माहिती प्रसारित करून पार्किंग व्यवस्थेची माहिती देणे गरजेचे आहे. त्यामुळे काही प्रमाणात पार्किंगचा प्रश्न सुटू शकेल. 
- हर्षा शहा,
अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

अडचणींतून काढवी लागते गाडी...
रविवारी सकाळी मी रेल्वेने मुंबई येथे जावून सायंकाळी माझे काम करून परत आलो. माझी दुचाकीची जागा बदलेली होती. तसेच दुचाकी अनेक गाड्यांमध्ये लावली होती. सायंकाळी परत आल्यावर अडचणीमधून मला गाडी काढत बसावे लागले. त्यात माझे १५ ते २० मिनिट गेले.
- विजयकुमार सिंग, प्रवासी

नियोजनाने सुटेल प्रश्न... नगर रस्ता, येरवडा, कोरेगाव पार्क, मुंढवा आदी भागात राहणाºया प्रवाशांनी सहा नंबर प्लॅटफॉर्मकडील प्रवेशद्वाराजवळील वाहनतळावर गाडी लावणे अपेक्षित आहे. परंतु, या ठिकाणी गाडी पार्क करण्यासाठी आरटीओपर्यंत वळसा घालून यावे लागते. त्यातच अलंकार टॉकीज जवळचा पुल सुमारे वर्षभरापासून बंद केला आहे. त्यामुळेही प्रवाशांना अनेक अडचणी येतात. मात्र, त्यावर रेल्वे प्रशासन आणि वाहतुक पोलिसांनी नियोजन करून पर्याय उपलब्ध करून दिल्यास रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी कमी होऊ शकेल.

Web Title: Vehicle parking will be suspended at 'A' Pune railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.