बेशिस्त वाढतेय...!, वाहनचालकांकडून नियमांची ऐसीतैशी, प्रशासन ढीम्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:17 AM2018-06-18T01:17:19+5:302018-06-18T01:17:19+5:30

मागील काही वर्षांपासून झपाट्याने वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येबरोबरच शहरातील वाहतुकीची बेशिस्तही वाढत चालल्याचे चित्र आहे.

Unconsciously growing ...!! | बेशिस्त वाढतेय...!, वाहनचालकांकडून नियमांची ऐसीतैशी, प्रशासन ढीम्म

बेशिस्त वाढतेय...!, वाहनचालकांकडून नियमांची ऐसीतैशी, प्रशासन ढीम्म

googlenewsNext

बारामती : मागील काही वर्षांपासून झपाट्याने वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येबरोबरच शहरातील वाहतुकीची बेशिस्तही वाढत चालल्याचे चित्र आहे. वाहतूक नियमांची ऐसीतैशी करीत बेलगाम वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचे ‘लोकमत’ पाहणीत दिसून आले. याबाबत प्रशासनच ढीम्म असून वाहतुकीची स्थिती सुधारण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे बारामतीकरांवर ‘सावधान’ म्हणण्याची वेळ आली आहे.
बारामती शहरासह लगतचा भाग, तसेच तालुक्यातील मोठ्या गावांच्या विकासाची गती वाढली आहे. शहराकडे येण्याचा लोकांचा ओढा वेगाने वाढत चालला आहे. परिणामी, शहरातील वाहनांच्या संख्येतही भर पडत चालली आहे. बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे २०१२-१३ पर्यंत एकूण २ लाख ३२ हजार २९ वाहनांची नोंदणी झाली होती. मागील पाच वर्षांत त्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. २०१७-१८ मध्ये या वाहनसंख्येत जवळपास दीड लाख वाहनांची भर पडली आहे. हा आकडा बारामतीसह दौंड व इंदापूर तालुक्यातील वाहनांचा असला तरी बारामती तालुक्यातील वाहनांची संख्या तुलनेने अधिक आहे.
एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना रस्ते मात्र अरुंदच राहिले. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढत्या वाहनांना शिस्त लावण्यासाठी अनेकदा तात्कालिक उपाययोजना करण्यात आल्या. नगरपालिका, पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागासह अन्य संबंधित विभागांकडून त्यावर ठोस उपाय न करण्यात आल्याने वाहतुकीचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. भविष्यात ही समस्या उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे होत विविध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे बारामतीकरांचे म्हणणे आहे.
>डबल पार्किंगचे ग्रहण
महावीर पथ, स्टेशन रोड, सिनेमा रोड, गुणवडी चौक ते बसस्थानकापर्यंत या प्रमुख मार्गांसह शहरातील अनेक रस्त्यांना डबल पार्किंगचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. बहुतेक रस्त्यांलगत दुचाकी उभ्या करतात.
त्यांच्यामागे चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने आधीच अरुंद रस्ते आणखी अरुंद होतात. त्यामुळे या भागात वारंवार वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण होत आहे.
>आरटीओकडील गेल्या तीन वर्षांतील वाहन नोंदणी
२०१५-१६
२३७८१
१७८४०
२५७४
२०१६-१७ २३६६५ १७६३१ ३२१७
२०१७-१८ ३२६६७ २४२४८ ३९२५
>उपाययोजना शून्य
सुरळीत वाहतुकीसाठी काही चौकांमध्ये काही वर्षांपूर्वी वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले. पण सध्या ते बंद आहेत. गर्दीच्यावेळी नियमनासाठी होमगार्डची नियुक्ती केली जाते. पण वाहनचालक त्यांनाही जुमानत नाहीत.
नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. रस्त्याच्याकडेला पार्किंगच्या जागा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. सर्वच रस्त्यांवर मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जात असल्याचे दिसून आले.
ट्रीपल सीट, मोबाईलवर बोलत दुचाकी चालविणे, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन घुसविणे असे प्रकार ठिकठिकाणी पाहायला मिळाले. अरुंद रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई होत नाही.
>नियमांचे उल्लंघन
महावीर पथ व स्टेशन रस्ता एकत्र येत असलेल्या चौकातून दोन्ही रस्त्यांवर तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसे फलकही लावण्यात आले आहेत. पण वाहनचालकांकडून त्याकडे दुर्लक्ष करीत वाहने दामटली जात असल्याचे पाहायला मिळाले. या चौकात काही वेळा पोलीसही असतात. पण त्यांनाही जुमानले जात नाही. त्यामुळे नेहमी वर्दळ असलेल्या हे दोन्ही रस्त्यांवरील वाहतूककोंडी नेहमीचीच झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Web Title: Unconsciously growing ...!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे