सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी कट्टे ; चार काडतूसे जप्त;  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:22 PM2018-05-26T15:22:11+5:302018-05-26T15:22:11+5:30

शिरूर तालुक्यातील गुणोरे परिसरात सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी कट्टे व चार काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

Two pistol and Four cartridges seized from Criminal | सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी कट्टे ; चार काडतूसे जप्त;  

सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी कट्टे ; चार काडतूसे जप्त;  

googlenewsNext
ठळक मुद्देनिघोज व पारनेर पोलिसांची कामगिरी, सदोष मनुष्यवधाचा तसेच अवैध शस्रे बाळगण्याचा गुन्हा दाखल

टाकळीहाजी :  शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पारनेर तालुक्यातील गुणोरे परिसरात प्रताप मंजाबा साळुंखे या इसमाकडून दोन गावठी कट्टे व चार काडतुसे जप्त करण्यात आली आहे. या कामी निघोज दूरक्षेत्रचे पोलीस हवालदार अशोक निकम व शिवाजी कावडे यांनी कोहकडी येथील ग्रामस्थांच्या मदतीने ही कामगिरी पार पाडली आहे.
पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, साळुंखे हा दुचाकीवर गुणोरे परिसरातून प्रवास करत असताना समोरून येणाºया रतिराम बाबुराव डेरंगे (रा. कूरूंद) या व्यक्तीला दुचाकीवरून धडक दिली. त्यावेळी पलायन करण्याचा प्रयत्नात असतानाच या अपघाताची माहिती निघोज पोलिसांना मिळाली. हवालदार निकम व पोलीस कर्मचारी शिवाजी कावडे यांनी दुचाकीवर साळुंखे याचा पाठलाग केला. यावेळी कोहकडी येथील ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली. साळुंखे यास हमालवाडी येथे पकडले. त्याच्याकडून  १ गावठी कट्टा व काडतूसे अशा वस्तू हस्तगत केल्या व त्यास ताब्यात घेतले.  
पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांना माहिती मिळाल्यानंतर ते निघोज व पारनेर पोलिसांनी साळुंखे याची चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आणखी एक गावठी कट्टा झाडीत फेकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी लगेच त्याला बरोबर घेऊन शोध घेतला. त्यावेळी एक कट्टा व काडतुसे जप्त करण्यात आली. 
पोलिसांनी साळुंखे याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा तसेच गुन्ह्यासाठी अवैध शस्रे बाळगण्याचा गुन्हा दाखल केला आहे. 
 

Web Title: Two pistol and Four cartridges seized from Criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.