खंडणी गुन्हयातील पैेसे स्विकारल्याप्रकरणी दोन बीट मार्शल निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 09:38 PM2018-05-29T21:38:41+5:302018-05-29T21:38:41+5:30

अपहरणकर्त्याकडून खंडणी स्वरूपात वसूल केलेले पैसे स्वीकारणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले.

Two beat marshal suspended for accepting money from extortion case | खंडणी गुन्हयातील पैेसे स्विकारल्याप्रकरणी दोन बीट मार्शल निलंबित

खंडणी गुन्हयातील पैेसे स्विकारल्याप्रकरणी दोन बीट मार्शल निलंबित

Next
ठळक मुद्देखंडणीतील पैसे पोलीस ठाण्याच्या लॉकरमध्ये

पुणे : अपहरण केलेल्या व्यक्तीकडून उकळलेल्या खंडणीतील २ लाख ४० हजार रुपये घेणाऱ्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील दोन बीट मार्शल पोलिसांना पोलीस उपायुक्त डॉ़ प्रवीण मुंढे यांनी निलंबित केले आहे़. अशोक जकप्पा मसाळ आणि सुरेश सोमलिंग बनसोडे अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत़. 
याप्रकरणी राहुल मनोहर कटकमवार (वय ३७, रा़ सिंहगड रोड) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़.  कटकमवार हे २२ मे रोजी सायंकाळी मोटारीने घरी जात असताना त्यांना बी़ टी़ कवडे रोडवरील सोपान बाग येथे आरोपींनी दुचाकी आडवी घालून थांबायला भाग पाडले़. त्यानंतर त्यांनी मोटारीत शिरुन त्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला. शहरात फिरविल्यानंतर त्यांना घेऊन ते भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावर थांबले होते़. कटकमवार यांनी नातेवाईकांकडून पैसे मागविले होते़ ते देण्यासाठी ते थांबले असताना गस्तीवर असलेले दोन बीट मार्शल मसाळ व बनसोडे यांना त्याचा संशय आला़. त्यांना मोटारीत पैसे आढळल्याने त्यांनी चौकशी केली़ तेव्हा आरोपींनी जमिनीच्या व्यवहारासाठी थांबल्याचे सांगितले़ ते अधिक चौकशी करु लागल्यावर त्यांच्यातील एकाने पोलिसांना बाजूला घेऊन खंडणीच्या पैशातील २ लाख ४० हजार दिले़. त्यानंतर बीट मार्शल निघून गेले़. कटकमवार यांनी सहआयुक्त रवींद्र कदम यांच्याकडे याविषयी तक्रार केल्यानंतर त्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट ५ कडे सोपविण्यात आला आहे़. पोलिसांविषयीची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली़. रात्रीच्या वेळी गस्तीवर कोण होते, याची चौकशी करण्यात आली़. त्यात या दोघांची नावे निष्पन्न झाली होती़. 
खंडणीतील पैसे पोलीस ठाण्याच्या लॉकरमध्ये
त्या रात्री गस्तीवर अशोक मसाळ आणि सुरेश बनसोडे असल्याचे दिसून आल्यावर त्यांच्याकडे चौकशी केली़. त्यांनी पैसे घेतल्याचे आढळून आले़. त्यांनी हे पैसे पोलीस ठाण्यातील त्यांच्या लॉकरमध्ये ठेवल्याचे समोर आले आहे़. त्यामुळे पोलीस उपायुक्त डॉ़ प्रवीण मुंढे यांनी त्या दोघांना निलंबित केले़. 

Web Title: Two beat marshal suspended for accepting money from extortion case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.