औंध भागात पोपट विक्रीसाठी आलेल्या तिघांना पकडले; वन विभागाकडून दोन पहाडी पोपट जप्त

By नितीश गोवंडे | Published: March 31, 2024 07:04 PM2024-03-31T19:04:56+5:302024-03-31T19:05:41+5:30

पहाडी पोपट बाळगणे, विक्री, तसेच शिकार केल्यास सात वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड अशी तरतूद आहे

Three arrested for selling parrots in Aundh area Forest department seized two hill parrots | औंध भागात पोपट विक्रीसाठी आलेल्या तिघांना पकडले; वन विभागाकडून दोन पहाडी पोपट जप्त

औंध भागात पोपट विक्रीसाठी आलेल्या तिघांना पकडले; वन विभागाकडून दोन पहाडी पोपट जप्त

पुणे : पहाडी पोपट विक्रीसाठी आलेल्या तिघांना वन विभागाने औंध भागात पकडले. त्यांच्याकडून दोन पहाडी पोपट जप्त करण्यात आले आहेत. पियूष दत्तात्रय पासलकर (२१, रा. कर्वेनगर), यश रमेश कानगुडे (२१), सौरभ कोडिंबा झोरे (१९, दोघे रा. वारजे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

औंध रस्त्यावरील लोहिया आयटी पार्क परिसरात पासलकर, कानगुडे, झोरे पहाडी पोपट (ॲलेकझांड्रीयन) विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला रविवारी मिळाली. त्यानंतर उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली भांबुर्डा विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप संकपाळ, वनरक्षक डाके आणि पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. त्यांच्याकडून दोन पहाडी पोपट जप्त करण्यात आले. या कारवाईसाठी साताऱ्यातील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सहकार्य केले. पहाडी पाेपट बाळगणे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत प्रतिबंधित आहे. पहाडी पोपट बाळगणे, विक्री, तसेच शिकार केल्यास सात वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड अशी तरतूद आहे.

Web Title: Three arrested for selling parrots in Aundh area Forest department seized two hill parrots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.