गर्भाशय प्रत्यारोपणाची देशातील सलग तिसरी शस्त्रक्रिया पुण्यात यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 06:41 PM2018-01-27T18:41:49+5:302018-01-27T18:50:11+5:30

वयाची पन्नाशी ओलांडलेल्या आईने आपल्या जन्मत:च गर्भाशय नसलेल्या मुलीला गर्भाशय दान केले. गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया गॅलेक्सी केअर लेप्रोस्कोपिक इन्स्टिट्यूटमध्ये यशस्वीपणे पार पडली.

Third consecutive surgery in the country of uterine transplant successfully succeeded in Pune | गर्भाशय प्रत्यारोपणाची देशातील सलग तिसरी शस्त्रक्रिया पुण्यात यशस्वी

गर्भाशय प्रत्यारोपणाची देशातील सलग तिसरी शस्त्रक्रिया पुण्यात यशस्वी

googlenewsNext
ठळक मुद्देआईने आपल्या जन्मत:च गर्भाशय नसलेल्या मुलीला गर्भाशय केले दानप्रत्यारोपण शस्त्रक्रियेस १४ तास लागत होते, हा वेळ साडे चार तासापर्यंत कमी करण्यात यश

पुणे : वयाची पन्नाशी ओलांडलेल्या आईने आपल्या जन्मत:च गर्भाशय नसलेल्या मुलीला गर्भाशय दान केले. गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया गॅलेक्सी केअर लेप्रोस्कोपिक इन्स्टिट्यूटमध्ये यशस्वीपणे पार पडली. देशातील ही सलग तिसरी शस्त्रक्रिया ठरली असून पहिल्यांदाच दुर्बिणीतून गर्भाशय वेगळे करण्याचा प्रयोग करण्यात आला.
इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी ही माहिती दिली. यावेळी डॉ. अरुण जामकर उपस्थित होते. प्रत्यारोपणासाठी दुर्बिणीच्या साह्याने शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढणे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. यापूर्वी झालेल्या दोन गर्भाशय प्रत्यारोपणाताही याच पद्धतीने दुर्बिणीतून शस्त्रक्रिया केल्या होत्या. जगभरात आतापर्यंत गर्भाशय दान करणाऱ्या महिलेच्या पोटाची चिरफाड करून गर्भाशय काढले जात होते. नविन पद्धतीमुळे रुग्णाच्या वेदना कमी करण्यात यश मिळाले आहे. तसेच प्रत्यारोपणासाठी गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेस १४ तास लागत होते. हा वेळ साडे चार तासापर्यंत कमी करण्यात यश आले आहे.

Web Title: Third consecutive surgery in the country of uterine transplant successfully succeeded in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे