सहजीवनाच्या प्रवासाला पुन्हा सुर त्यांचे जुळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 03:23 PM2018-04-24T15:23:52+5:302018-04-24T15:23:52+5:30

तीन वर्षांपासून मतभेदांमुळे वेगवेगळे राहत असलेल्या पती-पत्नीने महालोकअदालतमध्ये झालेल्या समुपदेशात पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.

They Decision to stay together for journey of companionship | सहजीवनाच्या प्रवासाला पुन्हा सुर त्यांचे जुळले 

सहजीवनाच्या प्रवासाला पुन्हा सुर त्यांचे जुळले 

Next
ठळक मुद्दे रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये दोघांचे समुपदेशन

पुणे : लग्न संस्थेतून आयुष्यभरासाठी जोडल्या गेलेल्या नात्याची परिपूर्णता समजुतदारपणात सामावलेली असते. सहजीवनाच्या पातळीवर काहीवेळा नात्यांचे धागे हळूहळू गुंफले जातात. काही साथीदारांच्या जीवनात या कधी नात्याचे बंध विरहातून घट्ट होत जाते. असाच काहीसा अनुभव तीन वर्षांपासून मतभेदांमुळे वेगवेगळे राहत असलेल्या पती-पत्नीने महालोकअदालतमध्ये झालेल्या समुपदेशात पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. समुपदेशातून त्यांचे वाद मिटले असून त्यांनी नव्याने आपल्या संसाराला सुरुवात केली.  
   थोरामोठ्यांच्या आशीवार्दाने त्यांचे लग्न झाले. मात्र, लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांच्यात वाद होऊ लागला. त्यांच्यात वैचारिक मतभेद निर्माण झाले. त्यामुळे सुरेखा अनेक दिवस माहेरी होती. तर मी तिला नांदवणारच नाही, अशी भूमिका सुरेश याने घेतली होती. भविष्याचा विचार करत दोघांनीही न्यायमूर्ती व्ही.आर. जगदाळे यांच्या पॅनेलमसमोर हे सकारात्मक पाऊ ल टाकले आहे. सुरेश आणि सुरेखा (नावे बदलेली) असे त्या दोघांची नावे आहेत. त्यात सुरेखापासून घटस्फोट मिळावा म्हणून सुरेशने शिवाजीनगर न्यायालयात २०१५ साली अर्जही दाखल केला होता. तेव्हापासून ते वेगवेगळे राहत होते. दरम्यान, रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये न्यायमूर्ती जगदाळे यांच्या पॅनेलसमोर दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी दोघांनी भविष्याचा विचार करत झाले-गेलेले विसरून नव्याने पुन्हा संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी न्यायमूर्ती व्ही.आर. जगदाळे , सुरेश यांचे वकील अ‍ॅड. संतोष काशिद, अ‍ॅड. सुनील क्षीरसागर यांनी तडजोडीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

Web Title: They Decision to stay together for journey of companionship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.