पुणे जिल्ह्यातील पेरणेफाटा येथे साडे पाच लाखाची चोरी; लोणी कंद पोलिसांत गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 06:42 PM2018-02-12T18:42:24+5:302018-02-12T18:44:54+5:30

पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ओमकार कलेक्शन या कपड्याच्या दुकानाचे मध्यरात्री शटर उचकटून अज्ञात चोरट्याने रोख ४५ हजार रुपये व विविध तयार कपड्यांसह सुमारे साडे पाच लाखाचा माल चोरीस गेला.

Theft of five and a half rupees at Perne phata in Pune district; Crime in Loni kand police | पुणे जिल्ह्यातील पेरणेफाटा येथे साडे पाच लाखाची चोरी; लोणी कंद पोलिसांत गुन्हा

पुणे जिल्ह्यातील पेरणेफाटा येथे साडे पाच लाखाची चोरी; लोणी कंद पोलिसांत गुन्हा

Next
ठळक मुद्देरोख ४५ हजार रुपये व विविध तयार कपड्यांसह सुमारे साडे पाच लाखाचा माल चोरीसअक्षय भिलारे यांच्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी केला पंचनामा

कोरेगाव भीमा : पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ओमकार कलेक्शन या कपड्याच्या दुकानाचे मध्यरात्री शटर उचकटून अज्ञात चोरट्याने रोख ४५ हजार रुपये व विविध तयार कपड्यांसह सुमारे साडे पाच लाखाचा माल चोरीस गेला.
याबाबत अक्षय भिलारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणी कंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणेफाटा (ता. हवेली) येथील अक्षय भिलारे यांच्या मालकीचे ओमकार कलेक्शन या कपड्याच्या दुकानाचे अज्ञात चोरट्यनी मध्यरात्रीचे सुमारास शटर उचकटून रोख ४५ हजार रुपये तसेच विविध कंपन्यांचे तयार कपड्यांसह सुमारे साडे पाच लाखाचा माल चोरुन नेला. सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर अक्षय भिलारे यांच्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ठसे तज्ज्ञ व श्वानपथकालाही पाचारण केले तसेच गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Theft of five and a half rupees at Perne phata in Pune district; Crime in Loni kand police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे